मद्यपान करण्यापूर्वी 'हे' सात पदार्थ खाणे गरजेचे! का ते जाणून घ्या

काहींना मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खूप त्रास होतो
 drinking Alcohol
drinking Alcohol esakal
Updated on

मद्यपान करणं अनेकांना आवडतं. पण ते मर्यादित प्रमाणात केलं तरच त्यामुळे होणारं नुकसान टाळता येतं. काहींना मद्यपान (Alcohol) केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डोकेदुखी, जडपणा आणि थकवा येतो. हे प्रमाण जर जास्त झालं तर अनेक लोक मद्यपान करणं टाळतात. पण काही पदार्थ (Food) असे आहेत की ते मद्यपान करण्याच्या आधी खाल्ले पाहिजेत. कारण ते खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी होणारा त्रास (Health Problem) कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, मद्यपान करण्यापूर्वी योग्य अन्न खाल्ल्यास भूक नियंत्रित ठेवता येते. तसेच पित्त, छातीत जळजळ आणि अपचन टाळण्यास हे पदार्थ मदत करतात.

१) अंड (Egg) - अंड्यात प्रथिने मूबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मद्यपान करण्यापूर्वी अंड खाल्ल्याने नंतरची लालसा कमी होते तसेच अल्कोहोल शोषणास विलंब होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंड उकडून, स्क्रंबल करून किंवा  ऑम्लेट खाऊ शकता.

केळी(Banana) - केळ्यात फायबर विपुल प्रमाणात असते. रक्तप्रवाहात अल्कोहोलचे प्रमाण कमी करण्यासाठी केळं प्रभावी मानले जाते. त्यात असणाऱ्या पोटॅशियममुळे मद्यपान केल्याने होणारे इलेक्ट्रोलाइट असंतुलन टाळता येते.
केळी(Banana) - केळ्यात फायबर विपुल प्रमाणात असते. रक्तप्रवाहात अल्कोहोलचे प्रमाण कमी करण्यासाठी केळं प्रभावी मानले जाते. त्यात असणाऱ्या पोटॅशियममुळे मद्यपान केल्याने होणारे इलेक्ट्रोलाइट असंतुलन टाळता येते. esakal
सेलमन फिश (Salmon) -  ओमेगा -3 फॅटी ऍसिडने सेलमन मासा समृद्ध आहे. त्यामुळे मेंदूतील जळजळ कमी होतेच शिवाय मद्यपानानंतर शरीरावर होणारा हानिकारर प्रभाव कमी करण्यास मदत होते.  तसेच त्यात प्रथिने आहेत. त्यामुळे अल्कोहोलचे शोषण कमी करण्यास मदत होते.

ग्रीक योगर्ट (Greek Yogurt) - ग्रीक योगर्ट प्रथिने, फॅट आणि कर्बोदकाने समृद्ध आहे. तज्ञांच्या मते, ग्रीक योगर्टमधील प्रथिने हळूहळू पचतात. तसेच अल्कोहोलचे शोषण कमी करून त्याचे परिणाम कमी करण्यास मदत करतात.

चिया सीड्स (Chia Seeds)- यात भरपूर प्रमाणात प्रथिने -फायबर देखील असते. बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स- रोझमॅरिनिक ऍसिड, गॅलिक ऍसिड आणि कॅफीक ऍसिड हे  पेशींचे नुकसान टाळतात. तसेच यकृताचे संरक्षण करण्यास मदत करतात.
चिया सीड्स (Chia Seeds)- यात भरपूर प्रमाणात प्रथिने -फायबर देखील असते. बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स- रोझमॅरिनिक ऍसिड, गॅलिक ऍसिड आणि कॅफीक ऍसिड हे पेशींचे नुकसान टाळतात. तसेच यकृताचे संरक्षण करण्यास मदत करतात.esakal
एव्होकाडो(Avocados)- यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्यामुळे ते प्रथिने किंवा कार्ब्सपेक्षा पचायला जास्त वेळ लागतो. या कारणामुळे अल्कोहोलचा त्रास कमी होण्यास मदत होते.
एव्होकाडो(Avocados)- यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्यामुळे ते प्रथिने किंवा कार्ब्सपेक्षा पचायला जास्त वेळ लागतो. या कारणामुळे अल्कोहोलचा त्रास कमी होण्यास मदत होते.esakal
​रताळे (Sweet Potatoes) - यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट पातळी संतुलित राहण्यास मदत होते. मद्यपान करण्यापूर्वी रताळे खाल्ल्याने कर्बोदकांमधे होणारा त्रास कमी होतो.
​रताळे (Sweet Potatoes) - यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट पातळी संतुलित राहण्यास मदत होते. मद्यपान करण्यापूर्वी रताळे खाल्ल्याने कर्बोदकांमधे होणारा त्रास कमी होतो. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com