केळीचं साल चुकूनही फेकू नका, फायदे तर जाणून घ्या...

केळं खाऊन झाल्यावर त्याचं साल आपण टाकून देतो.
banana peel
banana peelesakal
Updated on

केळं खाणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं समजलं जातं. त्यात असलेल्या व्हिटामिन, पॉटेशियम (Potassium) तुमच्या शरीरासाठी (Body) फायद्याचे आहे. ज्याप्रमाणे केळं (Banana) आरोग्यासाठी चांगलं आहे त्याप्रमाणे केळ्याचं सालही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आपण सगळेच केळं खाऊन झाल्यावर त्याचं साल टाकून देतो. पण आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. केळ्यात भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वे आहेत. तर त्याच्या सालीमध्येही व्हिटॅमिन बी ६ आणि बी १२ असते. तसेच तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही साल फायद्याचे आहे. केळ्याच्या सालाचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत, ते समजून घेणे महत्वाचे आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते (Immunity Boost)- 
रोगप्रतिकारक शक्ती व्हिटॅमिन ए मुळे वाढते. केळ्याच्या सालीत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे साल खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तसेच इंफेक्शनपासून लढण्यास मदत मिळेल. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अनेक गोष्टी खाणे गरजेचे आहे. त्यासाठी केळ्याचे साल खाणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते (Immunity Boost)- रोगप्रतिकारक शक्ती व्हिटॅमिन ए मुळे वाढते. केळ्याच्या सालीत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे साल खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तसेच इंफेक्शनपासून लढण्यास मदत मिळेल. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अनेक गोष्टी खाणे गरजेचे आहे. त्यासाठी केळ्याचे साल खाणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. google
banana peel
फक्त केळ नव्हे, तर त्याचे फुलही असते आरोग्यासाठी फायदेशीर!
दातांनाही फायदा (Teeth Care) - दात स्वच्छ करण्यासाठी केळ्याच्या सालाचा वापर करणे, फायद्याचे आहे. दात जर पिवळे पडत असतील तर ते चमकवण्यासाठी या सालांचा उपयोग होऊ शकतो.
दातांनाही फायदा (Teeth Care) - दात स्वच्छ करण्यासाठी केळ्याच्या सालाचा वापर करणे, फायद्याचे आहे. दात जर पिवळे पडत असतील तर ते चमकवण्यासाठी या सालांचा उपयोग होऊ शकतो. sakal
banana peel
Dental Care| दात न घासता दिवसाची सुरुवात करताय? जाणून घ्या दुष्परिणाम!
उच्च रक्तदाब ( Blood Pressure Care) -
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी केळीचे साल आवर्जून खावे. सालात असलेल्या पॉटेशियममुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत होते
उच्च रक्तदाब ( Blood Pressure Care) - ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी केळीचे साल आवर्जून खावे. सालात असलेल्या पॉटेशियममुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत होते esakal
banana peel
तुम्हाला उच्च रक्तदाब आहे? तर 'हे' पदार्थ खाणे टाळा
पचनास फायदा (Digestive)-
केळ्याच्या सालीत फायबरचे प्रमाण योग्य असते. पोटातल्या अन्नाचे पचन होण्यासाठी फायबर किती प्रमाणात लागते हे तुम्हाला माहिती आहेच. म्हणूनच आहारात केळ्याच्या सालाचा समावेश करणे गरजेचे आहे.
पचनास फायदा (Digestive)- केळ्याच्या सालीत फायबरचे प्रमाण योग्य असते. पोटातल्या अन्नाचे पचन होण्यासाठी फायबर किती प्रमाणात लागते हे तुम्हाला माहिती आहेच. म्हणूनच आहारात केळ्याच्या सालाचा समावेश करणे गरजेचे आहे. esakal
हाडांसाठीही फायदा (Bones Health) -
केळ्यासह त्याच्या सालात हाडांसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. थंडीत हाडांच्या अनेक समस्या प्रकर्षाने जाणवतात. अशावेळी केळ्याचे साल खाणे फायद्याचे ठरते.
हाडांसाठीही फायदा (Bones Health) - केळ्यासह त्याच्या सालात हाडांसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. थंडीत हाडांच्या अनेक समस्या प्रकर्षाने जाणवतात. अशावेळी केळ्याचे साल खाणे फायद्याचे ठरते. esakal
banana peel
हाडं मजबूत ठेवायची आहेत, अशी घ्या काळजी
त्वचा उजळण्यासाठी उपयोग (Skin Care) 
जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ किंवा फोड येत असतील तर केळ्याचे साल त्यावर घासल्याने आराम मिळतो. सालामुळे तुमची त्वचा उजळते. त्यामुळे स्किन केयरमध्ये तुम्ही केळ्याचे सालही वापरावे.
त्वचा उजळण्यासाठी उपयोग (Skin Care) जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ किंवा फोड येत असतील तर केळ्याचे साल त्यावर घासल्याने आराम मिळतो. सालामुळे तुमची त्वचा उजळते. त्यामुळे स्किन केयरमध्ये तुम्ही केळ्याचे सालही वापरावे. skin

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com