PHOTOS : टाटाच्या 'या' कारसमोर इतर SUV फेल; पाहा यादी | Top selling SUV cars in India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS : टाटाच्या 'या' कारसमोर इतर SUV फेल; पाहा यादी

Top Selling cars in April 2022

Top Selling cars in April 2022: अलीकडच्या काळात टाटा मोटर्सची एसयूव्ही टाटा नेक्सॉन लोकांच्या चांगलीच पसंतीस पडल्याचं दिसत आहे. Tata Nexon एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. नेक्सॉनने मारुती विटारा ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, किआ सोनेट, महिंद्रा एक्सयूव्ही (महिंद्रा XUV300), Renault Kiger, Nissan Magnite यासह अनेक कंपन्यांच्या SUV विक्रीत मागे टाकले आहे. विशेष बाब म्हणजे नेक्सॉनचा बाजारातील हिस्सा एक चतुर्थांशपेक्षा जास्त आहे. Tata Nexon च्या यशामागे Nexon EV ने देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. एप्रिल 2022 मध्ये एकूण 8 कंपन्यांनी त्यांच्या SUV च्या 51,048 युनिट्सची विक्री केली. तथापि, मार्च 2022 मध्ये 55,502 युनिट्सची विक्री झाली. जाणून घेऊया एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 5 एसयूव्हींबद्दल ...

1. टाटा नेक्सॉन - Tata Nexon ने एप्रिल 2022 मध्ये 13471 युनिट्स विकल्या. मार्चमध्ये 2022 मध्ये नेक्सॉनच्या 14315 युनिटची विक्री झाली होती. गेल्या महिन्याच्या तुलनेत मासिक विक्री 5.89% कमी होती. नेक्सॉनचा सध्याचा बाजार हिस्सा 26.38% आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी त्याचा बाजार हिस्सा 14.13% होता. म्हणजेच कंपनीचा बाजार हिस्सा यंदा 12.25% ने वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत दरमहा सरासरी 12203 युनिट्सची विक्री झाली आहे.

2. मारुती विटारा ब्रेझा- एप्रिल 2022 मध्ये, मारुती विटारा ब्रेझाच्या 11764 युनिट्सची विक्री झाली. मार्च 2022 मध्ये त्याची 12439 विक्री झाली. म्हणजेच मासिक विक्री 5.42% कमी झाली. ब्रेझाचा सध्याचा बाजार हिस्सा 23.04% आहे. मागील वर्षी ब्रेझाचा बाजार हिस्सा 22.85% होता. म्हणजेच कंपनीचा बाजार हिस्सा 0.19% ने वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत दरमहा सरासरी 9932 युनिट्सची विक्री झाली आहे.

3. ह्युंदाई वेन्यू- Hyundai Venue ने एप्रिल 2022 मध्ये 8392 युनिट्सची विक्री केली. मार्च 2022 मध्ये तिची 9220 विक्री झाली होती. म्हणजेच मासिक विक्री ८.९८% ने घटली आहे. वेन्यूचा सध्याचा बाजार हिस्सा 16.43% आहे. त्याच वेळी, मागील वर्षी बाजार हिस्सा 22.9% होता. म्हणजेच कंपनीचा बाजार हिस्सा 6.47% ने घसरला आहे. गेल्या 6 महिन्यांत दरमहा सरासरी 9943 युनिट्सची विक्री झाली आहे.

4. किआ सॉनेट- किआ सॉनेटने एप्रिल 2022 मध्ये 5404 युनिट्सची विक्री केली. तथापि, मार्च 2022 मध्ये त्याची 6871 विक्री झाली. त्यानुसार मासिक विक्री 21.35% कमी होती. तिचा सध्याचा बाजार हिस्सा 10.58% आहे. सॉनेटचा बाजार हिस्सा गेल्या वर्षी 15.73% होता. म्हणजेच, कंपनीचा बाजार हिस्सा 5.15% ने घसरला आहे. गेल्या 6 महिन्यांत दरमहा सरासरी 5612 युनिट्सची विक्री झाली आहे.

5. महिंद्रा XUV300- महिंद्रा XUV300 ने एप्रिल 2022 मध्ये 3909 युनिट्स विकल्या. मार्च 2022 मध्ये XUV300ची 4140 विक्री झाली. गतमहिन्याच्या तुलनेत मासिक विक्री 5.57% कमी होती. या एसयूव्हीचा सध्याचा बाजार हिस्सा 7.65% आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी त्याचा बाजार हिस्सा 8.44% होता. म्हणजेच कंपनीचा बाजार हिस्सा 0.79% ने घसरला आहे. गेल्या 6 महिन्यांत दरमहा सरासरी 4278 युनिट्सची विक्री झाली आहे.

go to top