PHOTO'S | CWG 2022 : वडिलांच्या हत्येतून सावरत तुलिका मानने रौप्य पदक केले पक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO'S | CWG 2022 : वडिलांच्या हत्येतून सावरत तुलिका मानने रौप्य पदक केले पक्के

Tulika Maan Whos Father Shot Dead Confirmed Silver Medal For India In Judo Commonwealth Games 2022 Birmingham

भारतीय महिला ज्यूदो खेळाडू तुलिका मानने राष्ट्रकुल स्पर्धेत कमाल केली. तिने 78 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. याचबरोबर तिने भारतासाठी ज्यूदोमधून तिसरे पदक पक्के केले. तुलिकाकडून आता सुवर्ण पदकाची आपेक्षा आहे.

भारतासाठी ज्यूदोपटू सुशिला देवीने पहिले रौप्या पदक जिंकले होते. मात्र आता तुलिकाकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा केली जात आहे. तुलिकाने न्यूझीलंडच्या सिडनी अँड्र्यूजला पराभूत करत अंतिम फेरी गाठली.

तुलिकाने 1 मिनिट 53 सेकंदात सामना जिंकला. तुलिकाचा इथंपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिच्या वडिलांची व्यावसायिक कारणातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी ती 14 वर्षाची होती.

या घटनेनंतर तुलिकाच्या आईने तिला वाढवले. तुलिकाची आई दिल्ली पोलीस दलात उप निरीक्षक पदावर कार्यरत आहे. तुलिकाने आपल्या वडिलांच्या हत्याच्या घटनेतून बाहेर पडत आपल्या कारकिर्दिवर लक्ष केंद्रित केले.

तुलिकाला 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणे अवघड झाले होते. तुलिकाला टॉप स्कीममधून बाहेर काढण्यात आले होते. तुलिका ही 4 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिली आहे.

टॅग्स :sports