Wed, Feb 1, 2023
तुझ्यात जीव रंगला: राणा-अंजलीचा रॉयल लूक चर्चेत
Published on : 31 August 2021, 9:33 am
'तुझ्यात जीव रंगाला' या मालिकेमधील राणा आणि अंजली यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेत राणा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने तर अंजली ही भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने साकारली होती.
अक्षया आणि हार्दिकने नुकतेच रॉयल लूकमधील फोटोशूट केले आहे.
फोटोशूटमधील दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
जांभळ्या रंगाचा लेहंगा आणि भरजरी ज्वेलरी असा लूक अक्षयाने केला आहे.
जांभळ्या रंगाची शेरवानी आणि फेटा अशा रॉयल लूकमध्ये हार्दिक अतिशय रूबाबदार दिसत आहे.
दोघांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.