Urfi Javed Biography | कोण आहे उर्फी जावेद? कुटुंब, कारकीर्द अन् आतापर्यंतचा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed Biography : कोण आहे उर्फी जावेद? कुटुंब, कारकीर्द अन् आतापर्यंतचा प्रवास

Urfi Javed Biography in Marathi
फॅशनच्या दुनियेत आजकाल एक नाव प्रत्येकाच्या जिभेवर आहे, ते नाव आहे उर्फी जावेद. बिग बॉस ओटीटीमध्ये उर्फीची एन्ट्री झाल्यापासून ती चर्चेत आहे.

उर्फीने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मास कम्युनिकेशनचेही शिक्षण घेतले आहे. तिला मीडियामध्ये जायचे होते पण तिला अभिनयाची आवड होती. त्यामुळे उर्फी अगदी लहान वयात मुंबईत आली. अभिनेत्री उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. 15 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेली उर्फी आता 24 वर्षांची आहे.

2016 मध्ये उर्फीला 'बडे भैया की दुल्हनिया' मध्ये अवनी पंतची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय उर्फीचा 'मेरी दुर्गा' हा सुप्रसिद्ध शो असून यामुळे ती अतिशय लोकप्रिय झाली. याशिवाय उर्फीने बेपनाह, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसोटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्येही अभिनय केला आहे.

उर्फी सर्वप्रथम बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसल्यानंतर ती युवकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

त्यानंतर विशेशतः उर्फीच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलची चर्चा होऊ लागली आणि आज ती अनेकांमध्ये स्टाइलिंग आयकॉन बनली आहे. एवढेच नव्हे तर, उर्फी अनेकदा सोशल मीडियावर तिच्या स्टाईलबद्दल चर्चेत असते.

उर्फी जावेदने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने तिच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींचा सामना केला आहे याबद्दल मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्या होत्या.

यामध्ये तिने काही गैरसमजामुळे तिचे कुटुंबियांशी संबंध चांगले राहिले नसल्याच्या खुलासा केला होता.

त्यानंतर जवळपास 2 वर्षे मानसिक त्रासाचा सामना केल्यानंतर उर्फीने स्वतःला संभाळत स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली.

एवढ्या सगळ्या समस्यांना सामोरे गेल्यानंतर त्यातून स्वतःला सावरत आज उर्फीने मुंबईच्या चकचकीत दुनियेतील छोटा का होईना पण एक तारा म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

go to top