esakal | उर्मिलाला पाहताच क्षणी प्रेमात पडला आदिनाथ अन्..

बोलून बातमी शोधा

उर्मिलाला पाहताच क्षणी प्रेमात पडला आदिनाथ अन्..
By
स्वाती वेमूल
Urmila & Adinath Kothare

अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांची प्रेमकहाणी फारच रंजक आहे. 'शुभमंगल सावधान' या चित्रपटासाठी महेश कोठारे हे नवीन चेहरा शोधत होते. याच चित्रपटानिमित्त उर्मिला त्यांच्या घरी गेली.

उर्मिलाला पाहताच क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो, असं आदिनाथने एका मुलाखतीत सांगितलं.

मुख्य अभिनेत्री म्हणून उर्मिलाचा 'शुभमंगल सावधान' हा पहिलाच चित्रपट होता आणि या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शन आदिनाथने केलं होतं. सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

उर्मिला-आदिनाथची पहिली डेट पुण्यात झाली. कॉलेज रोडवरील कॅफे कॉफी डेमध्ये ते भेटले होते. त्या भेटीनंतर मुंबईत आल्यावर आदिनाथने तिला प्रपोज केलं.

२०११ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांना जिजा ही मुलगी आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)