Photos : 'विदर्भ' शासन, महाराष्ट्र दिनी नागपुरात फलकांवर लागले स्टीकर
नागपूर : वेगळा विदर्भाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विदर्भावादी काळा दिवस पाळतात. आज देखील विदर्भवाद्यांनी आंदोलन केले आहे. विदर्भवाद्यांनी अनेक शासकीय फलकांवर ''महाराष्ट्र''ऐवजी विदर्भ असं लिहिलंय. विदर्भाचे स्टीकर अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.
उपराजधानी नागपुरात विदर्भावाद्यांनी सरकारी कार्यालयांवरील ''महाराष्ट्र'' या शब्दावर ''विदर्भ'' नावाचे स्टीकर लावले आहेत.
आज देखील वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी हे स्टीकर लावण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचा विकास होत असला तरी विदर्भाकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विदर्भवाद्यांकडून सातत्याने केला जातो.
विदर्भावरील अन्याय दूर करण्यासाठी वेगळ्या राज्याची मागणी विदर्भवाद्यांकडून सातत्याने केली जाते.
२९ डिसेंबर १९५३ रोजी फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने प्रथम राज्य पुनर्रचना आयोग नेमला होता.