PHOTO : भंडारदरा जलशयातून विसर्ग; पर्यटकांना खुणावतोय रंधा धबधबा

Randhafall Dhabdhaba
Randhafall Dhabdhabaesakal
Updated on

अकोले : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्य वृष्टी होत असून भंडारदरा जलश्यातून ५५४० क्युसेक तर निळवंडेधरणातून ७१३३ क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे वीज प्रकल्पाची वीजनिर्मिती सुरू झाली असून, जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने रंधा धबधबा पुन्हा एकदा अवतीर्ण झाल्याने पर्यटकांची पाऊले भंडारदरा परिसरात वळू लागली आहेत. शाखा अभियंता अरविंद जाधव यांनी सकाळी साडेसहा वाजता निळवंडे जलाशयातून ७१३३ क्युसेक तर जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस असल्याने जलाशयातून ५५४० क्युसेक विसर्ग सुरू असल्याचे सांगितले. तर वाकी जलाशयातून ७०० क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कृष्णवंतीला पूर आल्याने रंधा धबधबा पुन्हा एकदा अवतीर्ण झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने भात खाचरात पाणी साचल्याने पिकांना जगवायचे कसे प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com