Indian Passport दाखवा आणि मिळवा या पाच सुंदर देशांचे नागरिकत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Passport दाखवा आणि मिळवा या पाच सुंदर देशांचे नागरिकत्व

passport

जर तुम्हाला दुसऱ्या देशात प्रवास करायचा असेल किंवा राहायचे असेल आणि तुमच्याकडे व्हिसा नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. जगात असे अनेक देश आहेत जे भारताचा पासपोर्ट पाहूनच आपल्या देशाचे नागरिकत्व देतात. यासाठी तुम्हाला फक्त काही डॉक्युमेंटस दाखवावी लागतील. चला तर मग जाणून घेऊया त्या देशांबद्दल.

ऑस्ट्रिया - या यादीत ऑस्ट्रिया हा पहिला क्रमांकावर आहे, जो केवळ पासपोर्टच्या आधारे भारतातील नागरिकांना नागरिकत्व देतो. ऑस्ट्रिया हा एक अतिशय सुंदर देश आहे. इथे राहण्यासाठी तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल. ऑस्ट्रियामध्ये राहण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या देशातून अर्ज करावा लागेल, त्यानंतर तुम्हाला डी व्हिसाच्या श्रेणीत सहा महिने राहण्याची परवानगी मिळेल आणि त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी राहण्यासाठी परवाना अर्ज करु शकता.

बेल्जियम - जर तुम्हाला हिवाळा आणि बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी बेल्जियम हा उत्तम पर्याय आहे. लोक बऱ्याचदा बेल्जियमला तेथील जेवणासाठी ओळखतात. बेल्जियम हा थोडा महागडा देश आहे पण इथे एकदा आलात तर इथून जावंसं वाटणार नाही. जर तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही काही पैसे भरून येथील नागरिकत्व घेऊ शकता. एकदा तुम्हाला बेल्जियममध्ये नोकरी मिळाली की, तुम्ही कायमस्वरूपी नागरिकत्वासाठी अर्ज करू शकता.

इक्वेडोर - इक्वेडोरमध्येही तुम्हाला नागरिकत्व अगदी सहज मिळते. इथे राहण्यासाठी वयोमर्यादा नाही किंवा कोणतेही कायदे असावेत असे नाही. जर तुम्ही निवृत्त झालेले व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी स्थायिक होण्यासाठी हे सर्वात योग्य ठिकाण आहे. इक्वेडोरमध्ये तुम्हाला बहुतेक शांत वातावरण अनुभवता येईल

बेलीज मेक्सिको आणि ग्वाटेमाला दरम्यान स्थित आहे. या देशातील बहुतेक लोक इंग्रजी बोलतात. येथे राहण्याचा खर्च खूपच कमी आहे. तुम्ही बेलीजमध्ये 30-दिवसांच्या व्हिजिटर व्हिसावर येऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत राहायचे आहे तोपर्यंत तुम्ही त्याचे रिन्यू करू शकता. जर तुम्हाला इथे कायमचे स्थायिक व्हायचे असेल तर तुम्हाला 1000 डॉलर्स आणि काही कागदपत्रे जमा करावी लागतील.

कोस्टा रिका जैवविविधतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. लोक सहसा येथे प्रवासासाठी तसेच स्वस्त डेस्टिनेशन वेडिंगसाठी येतात. येथे भेट देण्याची मुख्य ठिकाणे म्हणजे बीच रिसॉर्ट्स. नायरा स्प्रिंग्स, टुमदार बंगले येथील आकर्षण आहे. जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्ही येथे राहण्यासाठी अर्ज करू शकता. येथे नोकरी मिळणे खूप सोपे आहे.

go to top