Photos : अचानक चर्चेत आलेले नरहरी झिरवाळ आहेत कोण? जाणून घ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photos : अचानक चर्चेत आलेले नरहरी झिरवाळ आहेत कोण? जाणून घ्या...

Who are the Narhari Zirwal who suddenly came into the discussion

मुंबई : सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना निलंबित करण्याची मागणी करीत आहे. तर शिंदे गट अस करता येणार नाही, असे म्हणत आहे. अपक्ष आमदार महेश बालदी व विनोद अग्रवाल यांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व गोंधळात नरहरी झिरवाळ अचानक चर्चेत आले. नरहरी झिरवाळ यांच्याकडे राज्य विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी आहे. अविश्वास ठराव आला असताना झिरवाळ आमदारांना निलंबित कसे काय करू शकतात? असा सवाल केला आहे. तेव्हा चर्चेत असलेले नरहरी झिरवाळ कोण आहेत? हे माहिती करूया... (Who are the Narhari Zirwal who suddenly came into the discussion)

नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते आदिवासी बहुल भागातील जनतेचे प्रतिनिधित्व करतात.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर व नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्षपद झिरवाळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत तेच हंगामी अध्यक्ष असतील.

साधी राहणीमान, मितभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. ते आदिवासी बहुल भागाचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून अशी झिरवाळ यांची ओळख आहे.

नरहरी झिरवाळ यांचे शिक्षण कला शाखेपर्यंत झाले आहे. कामात मन रमत नसल्याने त्यांनी नोकरी सोडून शेती करायला सुरुवात केली.

जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

२००१ साली झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले.

झिरवाळ यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तरी ते शेतीचे काम करतात. अजित पवार यांनी २०१९ मध्ये पक्षाविरोधात बंड केले होते. त्यांच्यासोबत तेव्हा १२ आमदार होते. त्यात नरहरी झिरवाळ यांचाही समावेश होता.