सतत वादात अडकणारी केतकी नेमकी कोण अन् तिची आतापर्यंतची वादग्रस्त प्रकरणे कोणती? |Ketaki Chitale Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतत वादात अडकणारी केतकी नेमकी कोण अन् तिची आतापर्यंतची वादग्रस्त प्रकरणे कोणती?

Ketaki Chitale

अभिनेत्री केतकी चितळे हि सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत येत असते. नुकतीच तिने शरद पवारांवर एक वादग्रस्त कविता फेसबुकवरुन शेअर केलीय याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र केतकी वादाच्या भोवऱ्यात पडली, ही पहिली वेळ नाही. सतत वादात अडकणारी ही केतकी नेमकी आहे तरी कोण आणि तिचे वादग्रस्त प्रकरणे जाणून घ्या.

केतकीने छोट्या पडद्यावरील तुझं माझं ब्रेकअप’या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. मात्र या मालिकेनंतर ती फारशी कुठे दिसली नाही. एपिलेप्सी या आजारावरील पोस्टमुळेही ती चर्चेत आली होती. याच आजारामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप तिने केला होता.

एपिलेप्सी या आजारावर केतकी वेगवेगळे उपचार घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नावदेखील ‘एपिलेप्सी वॉरियर क्वीन’असं ठेवलं आहे. एकदा दात दुखीच्या त्रासाला कंटाळून केतकी एका डेंटिस्टकडं गेली होती. पण डेंटिस्टनं एपिलेप्सी असल्याचं कारण सांगत केतकीचा दात काढण्यास नकार दिल्याचा आरोप एक व्हिडिओ शेअर करत केतकीनं केला होता.

1.केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा एका पोस्ट मध्ये एकेरी उल्लेख केला होता. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. यामुळे केतकीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. या पोस्टवरून शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने धमकी दिल्याचा आरोप करत तिने स्क्रीनशॉटही शेअर केला होता.

केतकीनं सोशल मीडियावर नवबौद्धांवर एका पोस्ट लिहली होती. यात तीने नवबौद्धांवर बोचरी टिका केली होती.या वरून केतकीविरोधात नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीत सहभागी असणारे कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 यावेळी तिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली आहे. केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून नेत्यांनी संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

go to top