Rajat Patidar| लिलावात कोणी खरेदी करायला तयार नव्हतं, आज IPL गाजवतोय; Rajat Patidar Photo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिलावात कोणी खरेदी करायला तयार नव्हतं, आज IPL गाजवतोय; Rajat Patidar Photo

आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटर सामन्यात रजत पाटीदार आरसीबीसाठी गेम चेंजर ठरला. रजतने 49 बॉलमध्ये ११२ धावा ठोकत शतक पूर्ण केले. इतकेच नव्हे तर त्याच्या नावांवर अनेक विक्रमांची नोंददेखील झाली आहे. खरतरं रजत लिलावात अनसोल्ड ठरला होता. त्याला खरेदी करायला कोणीही तयार नव्हंत. पण संधी मिळताच रजतने त्याच सोनं केलं.

 एलिमिनेटर सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा रजत मुळचा इंदौरचा आहे. त्याचा जन्म १ जून १९९३ मध्ये झाला. वयाच्या ८ व्या वर्षी त्याने मैदानात पहिले पाऊल ठेवलं.

रजत पाटीदार मध्य प्रदेशकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. 31 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 7 अर्धशतकांच्या मदतीने 861 रन केले आहेत.

रजतने इंदौर जवळील देवास शहरामध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्याने त्याचे महाविद्यालयीन शिक्षणदेखील तिथेच पूर्ण केलं. त्याचे संपूर्ण नाव रजत मनोहर पाटीदार असे आहे. खरतंर रजत फुटबॉलप्रेमी आहे.

रजत पाटीदार ने 2015-16 मध्ये रणजी ट्रॉफीद्वारे पदार्पण केलं. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध २०२१ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं.  यंदाच्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यामुळे पाटीदार बांगलादेशमध्ये ढाका प्रीमीयर लिगमध्ये किंवा युकेमध्ये क्लब क्रिकेट खेळायला जाणार होता, पण माईक हेसन यांच्या एका फोनमुळे त्याचं आयुष्य बदलं.

रजत पाटीदार आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड ठरला, पण आरसीबीने लिलावात विकत घेतलेल्या लवनिथ सिसोदियाला दुखापत झाली, यानंतर आरसीबीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट माईक हेसन यांनी पाटीदारला फोन केला आणि बॅग पॅक करून आरसीबीच्या टीममध्ये यायला सांगितलं. पाटीदारला आरसीबीने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं.

पाटीदारच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली. आयपीएलमध्ये शतक करणारा पाटीदार चौथा अनकॅप खेळाडू ठरला, याआधी पॉल वल्थाटी, मनिष पांडे, देवदत्त पडिक्कल यांनी शतकं केली होती. तसेच आयपीएलमधला अनकॅप खेळाडूचा हा तिसरा सर्वाधिक स्कोअर आहे. इतकेच नव्हे तर  आयपीएल प्ले-ऑफमध्ये शतक करणारा पाटीदार सहावा खेळाडू ठरला आहे.

रजतने सामन्यात झंझावाती शतक झळकवातान 112 धावा चोपल्या. त्याने 54 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकार ठोकले. त्याच्या खेळीच्या बळावरच बंगळुरुने 207 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 193 धावाच करु शकला.

टॅग्स :IPLRCBVirat kohliIPL 2022
go to top