World Heritage Day : पुण्यातील महत्त्वाची ऐतिहासिक स्थळं पाहिलीत का?

pune historical places
pune historical placessakal
Updated on

Pune Historical Places विद्येच्या माहेरघराबरोबरच ऐतिहासिक वारसा जपणारं शहर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. काळाच्या ओघातही या वास्तू आपला देदीप्यमान इतिहास अभिमानानं आपल्या अंगाखांद्यावर मिरवत आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय बदलांचे साक्षीदार ठरलेल्या या वास्तू प्रत्येकाने पाहायलाच हव्यात. जागतिक वारसा दिनानिमित्त पुण्याचे मुकुटमणी ठरलेल्या या स्थळांचे महत्त्व जाणून घेऊ या.

Top Sights In Pune

महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai)- स्थापना : ५ ऑक्टोबर १८८६ (उद्घाटन)वैशिष्ट्ये : पुणे शहराच्या नगरपालिकेचे कार्यालय मध्यवस्तीत असावे तसेच बंदिस्त मंडई असावी या दुहेरी हेतूने १८८२ रोजी पुणे नगरपालिकेत ही वास्तू बांधण्याचा प्रस्ताव मांडला गेला. शहराच्या मध्यवर्ती असणारी चार एकर जागा निश्चित करून बांधकामास सुरुवात झाली. पुढील तीन वर्षांमध्ये अंदाजे तीन लाख रुपये खर्चून ह्या ईमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. तत्कालिन मुंबई प्रांताचे गव्हर्नर 'ड्यूक ऑफ कनॉट, के. जी’ म्हणजेच लॉर्ड रे यांच्या हस्ते मंडईच्या इमारतीचे उद्घाटन झाले. म्हणूनच ह्या वास्तूस अनेक वर्षे रे मार्केट असे संबोधण्यात येत असे. १९३८ मध्ये आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेचे सभासद असताना त्यांनी या मंडईचे ‘महात्मा फुले मंडई’ असे नामकरण केले. १९६६ सालापर्यंत पुणे महानगरपालिकेचे कार्यालय याच इमारतीत होते.
महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai)- स्थापना : ५ ऑक्टोबर १८८६ (उद्घाटन)वैशिष्ट्ये : पुणे शहराच्या नगरपालिकेचे कार्यालय मध्यवस्तीत असावे तसेच बंदिस्त मंडई असावी या दुहेरी हेतूने १८८२ रोजी पुणे नगरपालिकेत ही वास्तू बांधण्याचा प्रस्ताव मांडला गेला. शहराच्या मध्यवर्ती असणारी चार एकर जागा निश्चित करून बांधकामास सुरुवात झाली. पुढील तीन वर्षांमध्ये अंदाजे तीन लाख रुपये खर्चून ह्या ईमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. तत्कालिन मुंबई प्रांताचे गव्हर्नर 'ड्यूक ऑफ कनॉट, के. जी’ म्हणजेच लॉर्ड रे यांच्या हस्ते मंडईच्या इमारतीचे उद्घाटन झाले. म्हणूनच ह्या वास्तूस अनेक वर्षे रे मार्केट असे संबोधण्यात येत असे. १९३८ मध्ये आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेचे सभासद असताना त्यांनी या मंडईचे ‘महात्मा फुले मंडई’ असे नामकरण केले. १९६६ सालापर्यंत पुणे महानगरपालिकेचे कार्यालय याच इमारतीत होते.
पाताळेश्वर लेणी (Pataleshwar Caves) - स्थापना |  राष्ट्रकूट राजवटीत इसविसनाच्या आठव्या शतकात (शिवाजीनगर)
वैशिष्ट्ये -  राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पूनकविषय (विषय म्हणजे जिल्हा) म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात. जमिनीच्या खाली खोदून ही तयार करण्यात आली आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते.  पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे. Iconic places in Pune
पाताळेश्वर लेणी (Pataleshwar Caves) - स्थापना | राष्ट्रकूट राजवटीत इसविसनाच्या आठव्या शतकात (शिवाजीनगर) वैशिष्ट्ये - राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पूनकविषय (विषय म्हणजे जिल्हा) म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात. जमिनीच्या खाली खोदून ही तयार करण्यात आली आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते. पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे. Iconic places in Punesakal
तुळशीबाग राम मंदिर -
स्थापना (Tulshibaug Ram Mandir) | १७६१.(पाणिपतच्या युद्धानंतर)
वैशिष्ट्ये  - पुण्याचे सुभेदार नारो अप्पाजी खैरे (तुळशीबागवाले) यांनी मंदिराच्या बांधकामासाठी तरतूद केली. १७९५ मध्ये हे पुर्ण झाले. एक लाख ३६ हजार ६६७ रुपये खर्चून बांधलेले हे मंदिर परीसर सुमारे एक एकर क्षेत्रात पसरले आहे. १८८४ मध्ये नंदराम नाईक यांनी कळस आणि सभामंडपाचे काम पूर्ण केले. मंदिराचे व्यवस्थापन श्री रामजी संस्‍थान करते. उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी बनवलेल्या राम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती नोव्हेंबर १७६५ मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आल्या होत्या. १७६७ मध्ये बखातराम पाथर्वत गुजराथी यांनी साकारलेली हनुमानाची मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली होती. नंतर १७८१ मध्ये गणपती आणि पार्वतीच्या मूर्ती मंदिरात आणण्यात आल्या आहेत. सध्या तुळशीबाग बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. पारंपारिक महाराष्ट्रीयन स्वयंपाकाच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधने, दागिने आणि घरगुती वस्तू तसेच पूजा साहित्यासह वस्तूंची विक्री होते.
तुळशीबाग राम मंदिर - स्थापना (Tulshibaug Ram Mandir) | १७६१.(पाणिपतच्या युद्धानंतर) वैशिष्ट्ये - पुण्याचे सुभेदार नारो अप्पाजी खैरे (तुळशीबागवाले) यांनी मंदिराच्या बांधकामासाठी तरतूद केली. १७९५ मध्ये हे पुर्ण झाले. एक लाख ३६ हजार ६६७ रुपये खर्चून बांधलेले हे मंदिर परीसर सुमारे एक एकर क्षेत्रात पसरले आहे. १८८४ मध्ये नंदराम नाईक यांनी कळस आणि सभामंडपाचे काम पूर्ण केले. मंदिराचे व्यवस्थापन श्री रामजी संस्‍थान करते. उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी बनवलेल्या राम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती नोव्हेंबर १७६५ मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आल्या होत्या. १७६७ मध्ये बखातराम पाथर्वत गुजराथी यांनी साकारलेली हनुमानाची मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली होती. नंतर १७८१ मध्ये गणपती आणि पार्वतीच्या मूर्ती मंदिरात आणण्यात आल्या आहेत. सध्या तुळशीबाग बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. पारंपारिक महाराष्ट्रीयन स्वयंपाकाच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधने, दागिने आणि घरगुती वस्तू तसेच पूजा साहित्यासह वस्तूंची विक्री होते.sakal
नाना वाडा (Nana Wada) -
स्थापना | १७८०.
वैशिष्ट्ये - नाना फडणवीस (१७४२-१८००) यांनी २० हजार चौरसफुटात हा वाडा बांधला आहे. पेशव्यांचे मुख्य दप्तर येथे होते. १९०७  मध्ये गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे, व्ही.बी. यांनी स्थापन केलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी. केळकर, एम.एस. गोळे आणि एन.के. १८८४ मध्ये धारप यांनी या वाड्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले. (pune historical places information in marathi)
नाना वाडा (Nana Wada) - स्थापना | १७८०. वैशिष्ट्ये - नाना फडणवीस (१७४२-१८००) यांनी २० हजार चौरसफुटात हा वाडा बांधला आहे. पेशव्यांचे मुख्य दप्तर येथे होते. १९०७ मध्ये गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे, व्ही.बी. यांनी स्थापन केलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी. केळकर, एम.एस. गोळे आणि एन.के. १८८४ मध्ये धारप यांनी या वाड्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले. (pune historical places information in marathi)
विश्रामबाग वाडा (Vishrambaug Wada) - 
स्थापना | १८०७
वैशिष्ट्ये - मराठा साम्राज्याचा पेशवा दुसरा बाजीराव याचा वाड्यात राहत होते. त्याकाळी सुमारे ३ लाख ५० हजार रुपये खर्चून हा वाडा बांधला गेला. शनिवार वाडा या पेशव्यांच्या वडिलार्जित वाड्यात राहण्यापेक्षा दुसऱ्या बाजीरावाने विश्रामबागवाड्यात राहणे पसंत केले. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात इ.स. १८१८ साली पुण्याचा पाडाव होईपर्यंत ११ वर्षे दुसऱ्या बाजीरावाचे येथे वास्तव्य होते. सुमारे २०,००० वर्ग फूट क्षेत्रफळाच्या या वाड्याचा बहुतांश भाग टिकला आहे. या वाड्यात सध्या टपाल कार्यालय, नगरपालिकेच्या काही कचेऱ्या व मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे. पुणे महापालिकेची सध्याची इमारत बांधून होण्यापूर्वी नगरपालिकेचे मुख्य कार्यालय विश्रामबागवाड्यामध्येच होते. (pune heritage)
विश्रामबाग वाडा (Vishrambaug Wada) - स्थापना | १८०७ वैशिष्ट्ये - मराठा साम्राज्याचा पेशवा दुसरा बाजीराव याचा वाड्यात राहत होते. त्याकाळी सुमारे ३ लाख ५० हजार रुपये खर्चून हा वाडा बांधला गेला. शनिवार वाडा या पेशव्यांच्या वडिलार्जित वाड्यात राहण्यापेक्षा दुसऱ्या बाजीरावाने विश्रामबागवाड्यात राहणे पसंत केले. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात इ.स. १८१८ साली पुण्याचा पाडाव होईपर्यंत ११ वर्षे दुसऱ्या बाजीरावाचे येथे वास्तव्य होते. सुमारे २०,००० वर्ग फूट क्षेत्रफळाच्या या वाड्याचा बहुतांश भाग टिकला आहे. या वाड्यात सध्या टपाल कार्यालय, नगरपालिकेच्या काही कचेऱ्या व मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे. पुणे महापालिकेची सध्याची इमारत बांधून होण्यापूर्वी नगरपालिकेचे मुख्य कार्यालय विश्रामबागवाड्यामध्येच होते. (pune heritage)sakal
डेक्कन कॉलेज स्नातकोत्तर आणि संशोधन संस्था (Deccan College Post Graduate and Research Institute) :
स्थापना | 6 ऑक्टोबर १८२१ (येरवडा).
वैशिष्ट्ये : सुरवातीच्या काळात हिंदू कॉलेज म्हणून या प्रतिष्ठीत संस्थेची ओळख होती. मुंबई प्रांताचे गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी दक्षिणा निधीचा वापर करत हिंदू कॉलेजची स्थापना केली. दक्षिणा निधीची सुरवात मराठा सरदार खंडेराव दाभाडे यांनी सुरू केली होती आणि पेशव्यांनी संस्कृत अभ्यासाच्या प्रचारासाठी हा निधी सुरू ठेवला होता. १९३४ मध्ये ब्रिटिश सरकारने हे कॉलेज बंद केले होते. परंतु माजी विद्यार्थ्यांच्या आणि जाणत्या नागरिकांच्या प्रयत्नांमुळे ते १७ ऑगस्ट १९३९ रोजी डेक्कन कॉलेज म्हणून पुन्हा सुरू करण्यात आले.
डेक्कन कॉलेज स्नातकोत्तर आणि संशोधन संस्था (Deccan College Post Graduate and Research Institute) : स्थापना | 6 ऑक्टोबर १८२१ (येरवडा). वैशिष्ट्ये : सुरवातीच्या काळात हिंदू कॉलेज म्हणून या प्रतिष्ठीत संस्थेची ओळख होती. मुंबई प्रांताचे गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी दक्षिणा निधीचा वापर करत हिंदू कॉलेजची स्थापना केली. दक्षिणा निधीची सुरवात मराठा सरदार खंडेराव दाभाडे यांनी सुरू केली होती आणि पेशव्यांनी संस्कृत अभ्यासाच्या प्रचारासाठी हा निधी सुरू ठेवला होता. १९३४ मध्ये ब्रिटिश सरकारने हे कॉलेज बंद केले होते. परंतु माजी विद्यार्थ्यांच्या आणि जाणत्या नागरिकांच्या प्रयत्नांमुळे ते १७ ऑगस्ट १९३९ रोजी डेक्कन कॉलेज म्हणून पुन्हा सुरू करण्यात आले.
अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (College Of Engineering Pune) :
स्थापना | जुलै १८५४.
वैशिष्ट्ये - स्थापना झाली तेंव्हा पूना इंजिनिअरिंग क्लास अॅन्ड मेकॅनिकल स्कूल म्हणून ओळखले जाणारे हे महाविद्यालय भवानी पेठेत स्थित होते. जून १८६५ मध्ये मिस्टर थिओडोर कुक यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. ज्यांनी २८ वर्षे हा कार्यभार सांभाळला. नवीन महाविद्यालयाची पायाभरणी ५ ऑगस्ट १८६५ रोजी गव्हर्नर सर बार्टल फ्रेरे यांच्या हस्ते करण्यात आली.  १९११ मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असे नामकरण करण्यात आले. भारतरत्न सर एम.विश्वेश्वरैया हे सीओईपीचे माजी विद्यार्थी असून, त्यांच्या स्मरणार्थ देशात अभियंता दिवस साजरा केला जातो.
अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (College Of Engineering Pune) : स्थापना | जुलै १८५४. वैशिष्ट्ये - स्थापना झाली तेंव्हा पूना इंजिनिअरिंग क्लास अॅन्ड मेकॅनिकल स्कूल म्हणून ओळखले जाणारे हे महाविद्यालय भवानी पेठेत स्थित होते. जून १८६५ मध्ये मिस्टर थिओडोर कुक यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. ज्यांनी २८ वर्षे हा कार्यभार सांभाळला. नवीन महाविद्यालयाची पायाभरणी ५ ऑगस्ट १८६५ रोजी गव्हर्नर सर बार्टल फ्रेरे यांच्या हस्ते करण्यात आली. १९११ मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असे नामकरण करण्यात आले. भारतरत्न सर एम.विश्वेश्वरैया हे सीओईपीचे माजी विद्यार्थी असून, त्यांच्या स्मरणार्थ देशात अभियंता दिवस साजरा केला जातो.sakal
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारत (Pune University Main Building) -
स्थापना | १८६४. 
वैशिष्ट्ये : मुंबईचे गव्हर्नर बार्टल फ्रेरे यांच्यासाठी अभियंता जेम्स ट्रबशॉवे यांनी निर्माण केली. ही इमारत साम्राज्यवादी स्थापत्य शैलीचा एक प्रकार आहे. ही इमारत प्रिन्स अल्बर्टच्या ऑस्बोर्न हाऊस वरील आयल ऑफ विट वरून प्रेरित आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारत (Pune University Main Building) - स्थापना | १८६४. वैशिष्ट्ये : मुंबईचे गव्हर्नर बार्टल फ्रेरे यांच्यासाठी अभियंता जेम्स ट्रबशॉवे यांनी निर्माण केली. ही इमारत साम्राज्यवादी स्थापत्य शैलीचा एक प्रकार आहे. ही इमारत प्रिन्स अल्बर्टच्या ऑस्बोर्न हाऊस वरील आयल ऑफ विट वरून प्रेरित आहे.
कौन्सिल हॉल (Council Hall) - स्थापना | १८७०. वैशिष्ट्ये : व्हेनेशियन गॉथिक शैलीतील ही ईमारत दगड आणि भाजलेल्या वीटांपासून बांधण्यात आली आहे. यात मध्यवर्ती चौकोनी टॉवर आणि लॅन्सेट खिडक्या आहेत. आतील भागात स्टेन्ड ग्लास पेंटिंग्ज आणि खोट्या छतावर आणि लोखंडी रेलिंगवर सोन्याच्या पानांची सजावट आहे. टॉवरच्या तळमजल्याला खुल्या कमानींचा आधार आहे, तर पहिल्या मजल्यावर व्हेनेशियन कमान आहे. १९ जुलै १९३७ रोजी मुंबई विधानसभेचे पहिले अधिवेशन आणि दुसऱ्या‍या दिवशी विधान परिषदेचेही पहिले अधिवेशन येथे झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मुंबई विधानसभेचे पहिले अधिवेशन याच सभागृहात १० सप्टेंबर १९४७ रोजी भरले होते. मुंबई प्रांताच्या पावसाळी अधिवेशनासाठी कौन्सिलहॉलचा वापर होत असे.
कौन्सिल हॉल (Council Hall) - स्थापना | १८७०. वैशिष्ट्ये : व्हेनेशियन गॉथिक शैलीतील ही ईमारत दगड आणि भाजलेल्या वीटांपासून बांधण्यात आली आहे. यात मध्यवर्ती चौकोनी टॉवर आणि लॅन्सेट खिडक्या आहेत. आतील भागात स्टेन्ड ग्लास पेंटिंग्ज आणि खोट्या छतावर आणि लोखंडी रेलिंगवर सोन्याच्या पानांची सजावट आहे. टॉवरच्या तळमजल्याला खुल्या कमानींचा आधार आहे, तर पहिल्या मजल्यावर व्हेनेशियन कमान आहे. १९ जुलै १९३७ रोजी मुंबई विधानसभेचे पहिले अधिवेशन आणि दुसऱ्या‍या दिवशी विधान परिषदेचेही पहिले अधिवेशन येथे झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मुंबई विधानसभेचे पहिले अधिवेशन याच सभागृहात १० सप्टेंबर १९४७ रोजी भरले होते. मुंबई प्रांताच्या पावसाळी अधिवेशनासाठी कौन्सिलहॉलचा वापर होत असे.
फर्ग्युसन महाविद्यालय (Fergusson College) - 
स्थापना | १८८५. 
वैशिष्ट्ये : हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून, सोसायटीची सुरवात चिपळूणकर, लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर,  विठ्ठल रामजी शिंदे, अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले.
फर्ग्युसन महाविद्यालय (Fergusson College) - स्थापना | १८८५. वैशिष्ट्ये : हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून, सोसायटीची सुरवात चिपळूणकर, लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले.
श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिर (Sadguru Shri Jangli Maharaj Samadhi Temple) - स्थापना | १८९० (मुक्तद्वार मंदिर). वैशिष्ट्ये - सद्गुरू श्रीजंगली महाराज यांनी १८९० मध्ये मुक्तद्वार मंदिर येथे समाधी घेतली. नगारखान्यातील मंदिराच्या प्रवेशद्वारातून सतरा अठरा पायऱ्या चढून वर गेले की प्रशस्त पटांगण आणि पुढे फरसदार मंडप लागतो. पटांगणात डाव्या बाजूला जवळ जवळ पंच्याहत्तर फूट उंचीचा ध्वजस्तंभ असून भगवा ध्वज सदैव फडकत असतो. मंडप हंड्या, झुंबरांनी सुशोभित असून तेथेच डाव्या हाताला नगारा आणि उजव्या हाताला छोटेखानी पण टुमदार अशी समाधी आहे. महाराजांच्या त्यांच्या गुरुंची आहे असे कित्येकांचे म्हणणे आहे. नगाऱ्याच्या डाव्या हाताला एका छोटेखानी देवळात पादुकांची स्थापना करण्यात आलेली असून जंगली महाराज तेथे स्नान करीत असत असे सांगतात. मंडपाच्या आतील बाजूस दोन-तीन पायऱ्या चढून गेले की दक्षिणोत्तर अशी प्रशस्त समाधी असून त्या समाधीच्या मागे जवळ जवळ नऊ-दहा फूट उंचीचे अतिभव्य आणि चित्ताकर्षक असे तैलचित्र आहे.
श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिर (Sadguru Shri Jangli Maharaj Samadhi Temple) - स्थापना | १८९० (मुक्तद्वार मंदिर). वैशिष्ट्ये - सद्गुरू श्रीजंगली महाराज यांनी १८९० मध्ये मुक्तद्वार मंदिर येथे समाधी घेतली. नगारखान्यातील मंदिराच्या प्रवेशद्वारातून सतरा अठरा पायऱ्या चढून वर गेले की प्रशस्त पटांगण आणि पुढे फरसदार मंडप लागतो. पटांगणात डाव्या बाजूला जवळ जवळ पंच्याहत्तर फूट उंचीचा ध्वजस्तंभ असून भगवा ध्वज सदैव फडकत असतो. मंडप हंड्या, झुंबरांनी सुशोभित असून तेथेच डाव्या हाताला नगारा आणि उजव्या हाताला छोटेखानी पण टुमदार अशी समाधी आहे. महाराजांच्या त्यांच्या गुरुंची आहे असे कित्येकांचे म्हणणे आहे. नगाऱ्याच्या डाव्या हाताला एका छोटेखानी देवळात पादुकांची स्थापना करण्यात आलेली असून जंगली महाराज तेथे स्नान करीत असत असे सांगतात. मंडपाच्या आतील बाजूस दोन-तीन पायऱ्या चढून गेले की दक्षिणोत्तर अशी प्रशस्त समाधी असून त्या समाधीच्या मागे जवळ जवळ नऊ-दहा फूट उंचीचे अतिभव्य आणि चित्ताकर्षक असे तैलचित्र आहे.
 गोखले इन्स्टिट्यूट (Gokhale Institute) - स्थापना   : १९०५. वैशिष्ट्ये - भारतीय नोकरदारांच्या शिक्षणास चालना देण्यासाठी व कार्यकारिणीसाठी भारतीय लोकांमध्ये क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. त्यातूनच गोखले इन्स्टिट्यूट नावारूपाला आली. गोखले अर्थशास्त्र संस्था ही स्थापनेपासून हिंद सेवक समाजाच्या ग्रंथालयाचा पूर्ण उपयोग करते. हे ग्रंथालय नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांनी १९०५ साली स्थापन केले. ग्रंथालयात २,५५,००० हून अधिक ग्रंथ आहेत, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४७२ नियतकालिके या ग्रंथालयात आहेत. व जवळ जवळ २००० नियतकालिकांचे जुने खंड ग्रंथालयात आहेत.
गोखले इन्स्टिट्यूट (Gokhale Institute) - स्थापना : १९०५. वैशिष्ट्ये - भारतीय नोकरदारांच्या शिक्षणास चालना देण्यासाठी व कार्यकारिणीसाठी भारतीय लोकांमध्ये क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. त्यातूनच गोखले इन्स्टिट्यूट नावारूपाला आली. गोखले अर्थशास्त्र संस्था ही स्थापनेपासून हिंद सेवक समाजाच्या ग्रंथालयाचा पूर्ण उपयोग करते. हे ग्रंथालय नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांनी १९०५ साली स्थापन केले. ग्रंथालयात २,५५,००० हून अधिक ग्रंथ आहेत, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४७२ नियतकालिके या ग्रंथालयात आहेत. व जवळ जवळ २००० नियतकालिकांचे जुने खंड ग्रंथालयात आहेत.
कृषी महाविद्यालय (College of Agriculture, Pune) - स्थापना : १९०७. (गणेशखिंड रस्ता). वैशिष्ट्ये : देशात  स्थापन झालेल्या पहिल्या पाच कृषी महाविद्यालयांपैकी हे एक आहे. या महाविद्यालयाचे मूळ शोधायला गेल्यास १८७९ पर्यंत मागे जावे लागेल. तेव्हाच्या कॉलेज ऑफ सायन्समध्ये (आताचे सीओईपी) कृषीविषयक अभ्यासासाठी वेगळा विभाग सुरू करण्यात आला होता. १८८० च्या दुष्काळ आयोगाने प्रत्येक प्रांताचा स्वतःचा एक कृषीविषयक विभाग असायला पाहिजे, असे सुचविले होते. त्यामुळे हा विभाग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालयाला कायमस्वरूपी इमारत हवी, यासाठी १९०५ साली १५० एकरांचा भूखंड राखून ठेवण्यात आला. ही इमारत १९११ साली बांधून झाली. तिचे उद्घाटन त्या काळचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड सिडेनहॅम यांच्या हस्ते करण्यात आले. आताच्या कृषी महाविद्यालयाची मुख्य इमारत दिमाखदार असून, ती दगड-विटांचा वापर करून बांधली आहे. इमारतीच्या मध्यभागी अर्धगोलाकार चंदेरी घुमट आहे. तो दूरवरूनही सहज नजरेस पडतो. या घुमटाखाली महाविद्यालयाचे  
मुख्य सभागृह आहे. या सभागृहाला संगमरवरी फरशीकाम केलेले असून, मध्यावर प्रशस्त जिना आहे.
कृषी महाविद्यालय (College of Agriculture, Pune) - स्थापना : १९०७. (गणेशखिंड रस्ता). वैशिष्ट्ये : देशात स्थापन झालेल्या पहिल्या पाच कृषी महाविद्यालयांपैकी हे एक आहे. या महाविद्यालयाचे मूळ शोधायला गेल्यास १८७९ पर्यंत मागे जावे लागेल. तेव्हाच्या कॉलेज ऑफ सायन्समध्ये (आताचे सीओईपी) कृषीविषयक अभ्यासासाठी वेगळा विभाग सुरू करण्यात आला होता. १८८० च्या दुष्काळ आयोगाने प्रत्येक प्रांताचा स्वतःचा एक कृषीविषयक विभाग असायला पाहिजे, असे सुचविले होते. त्यामुळे हा विभाग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालयाला कायमस्वरूपी इमारत हवी, यासाठी १९०५ साली १५० एकरांचा भूखंड राखून ठेवण्यात आला. ही इमारत १९११ साली बांधून झाली. तिचे उद्घाटन त्या काळचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड सिडेनहॅम यांच्या हस्ते करण्यात आले. आताच्या कृषी महाविद्यालयाची मुख्य इमारत दिमाखदार असून, ती दगड-विटांचा वापर करून बांधली आहे. इमारतीच्या मध्यभागी अर्धगोलाकार चंदेरी घुमट आहे. तो दूरवरूनही सहज नजरेस पडतो. या घुमटाखाली महाविद्यालयाचे मुख्य सभागृह आहे. या सभागृहाला संगमरवरी फरशीकाम केलेले असून, मध्यावर प्रशस्त जिना आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळ (Bharat Itihas Sanshodhak Mandal) - स्थापना : ७ जुलै १९१०. वैशिष्ट्ये - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि खं. चिं. मेहंदळे यांनी या संस्थेची स्थापना केली. मराठाकालीन इतिहासविषयक नोंदींच्या संग्रहाचे पुनरुज्जीवन, पुनर्लेखन आणि भारतीय इतिहासाचा शास्त्रीय अभ्यास या हेतूने ही संस्था उभारण्यात आली. त्यानंतर भारतीय इतिहास व संस्कृती यांविषयीचे संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कामही संस्थेने स्वीकारले. संस्थेचे कार्यालय आधी मेहेंदळे यांच्या अप्पा बळवंत चौकातील वाड्यात होते. नंतर ते शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सदाशिव पेठेतील आत्ताच्या जागेत स्थलांतरित झाले. ब्रिटीशकालीन स्थानिक पद्धतीने बांधलेली सध्याची इमारत १९१२ ते १९२० या दरम्यानच्या काळात बांधली आहे. आजघडीला मंडळाकडे सुमारे २५ लाख मोडी कागदपत्रे, ३० हजार हस्तलिखित पोथ्या, ५० हजार इतिहासविषयक ग्रंथ, १६०० लघुचित्रे तसेच विविध ताम्रपट, शस्त्रे, सोन्याची, चांदीची व तांब्याची नाणी यांचा संग्रह आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळ (Bharat Itihas Sanshodhak Mandal) - स्थापना : ७ जुलै १९१०. वैशिष्ट्ये - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि खं. चिं. मेहंदळे यांनी या संस्थेची स्थापना केली. मराठाकालीन इतिहासविषयक नोंदींच्या संग्रहाचे पुनरुज्जीवन, पुनर्लेखन आणि भारतीय इतिहासाचा शास्त्रीय अभ्यास या हेतूने ही संस्था उभारण्यात आली. त्यानंतर भारतीय इतिहास व संस्कृती यांविषयीचे संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कामही संस्थेने स्वीकारले. संस्थेचे कार्यालय आधी मेहेंदळे यांच्या अप्पा बळवंत चौकातील वाड्यात होते. नंतर ते शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सदाशिव पेठेतील आत्ताच्या जागेत स्थलांतरित झाले. ब्रिटीशकालीन स्थानिक पद्धतीने बांधलेली सध्याची इमारत १९१२ ते १९२० या दरम्यानच्या काळात बांधली आहे. आजघडीला मंडळाकडे सुमारे २५ लाख मोडी कागदपत्रे, ३० हजार हस्तलिखित पोथ्या, ५० हजार इतिहासविषयक ग्रंथ, १६०० लघुचित्रे तसेच विविध ताम्रपट, शस्त्रे, सोन्याची, चांदीची व तांब्याची नाणी यांचा संग्रह आहे.sakal
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर(The Bhandarkar Oriental Research Institute)  - स्थापना : ६ जुलै १९१७. वैशिष्ट्ये - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावे या संस्थेची स्थापना करण्यात आली. प्रारंभी डॉ. भांडारकरांनी आपल्या ग्रंथांचा आणि संशोधनपत्रिकांचा अनमोल संग्रह संस्थेला दिला. पुढील वर्षी तत्कालीन मुंबई इलाख्याच्या सरकारने आपल्याजवळचा संस्कृत-प्राकृत हस्तलिखितांचा संग्रह आणि संस्कृत-प्राकृत ग्रंथमाला संस्थेकडे दिली. १९१९ मध्ये संस्थेने स्वतःची संशोधनपत्रिका, महाभारताच्या चिकित्सक पाठवृत्तीचा प्रकल्प, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेची योजना आणि स्नातकोत्तर अध्ययन आणि संशोधन विभाग ही चार कार्ये सुरु केली. संस्थेत सुमारे १, २५, ००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९, ५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. तर, संस्थेच्या डॉ. रा. ना. दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी वीस हजार पुस्तके दुर्मिळ आहेत.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर(The Bhandarkar Oriental Research Institute) - स्थापना : ६ जुलै १९१७. वैशिष्ट्ये - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावे या संस्थेची स्थापना करण्यात आली. प्रारंभी डॉ. भांडारकरांनी आपल्या ग्रंथांचा आणि संशोधनपत्रिकांचा अनमोल संग्रह संस्थेला दिला. पुढील वर्षी तत्कालीन मुंबई इलाख्याच्या सरकारने आपल्याजवळचा संस्कृत-प्राकृत हस्तलिखितांचा संग्रह आणि संस्कृत-प्राकृत ग्रंथमाला संस्थेकडे दिली. १९१९ मध्ये संस्थेने स्वतःची संशोधनपत्रिका, महाभारताच्या चिकित्सक पाठवृत्तीचा प्रकल्प, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेची योजना आणि स्नातकोत्तर अध्ययन आणि संशोधन विभाग ही चार कार्ये सुरु केली. संस्थेत सुमारे १, २५, ००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९, ५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. तर, संस्थेच्या डॉ. रा. ना. दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी वीस हजार पुस्तके दुर्मिळ आहेत.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com