Fri, March 24, 2023
WPL मध्ये होळी दणक्यात; विदेशी खेळाडूंचे ग्रँड सेलिब्रेशन
Published on : 8 March 2023, 3:46 am
महिला प्रीमियर लीगची धमाकेदार सुरुवात झाली आहे. अनेक लढती चुरशीच्या होताना दिसत आहे. अशातच टीम्सनी होळी दणक्यात साजरी केली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
महिला क्रिकेटपटूंनी होळीचा सण साजरा केला आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये विदेशी महिला खेळाडू रंगोत्सव उत्साहात साजरा करताना दिसत आहेत.
पहिल्यांदाच महिला आयपीएलमध्ये होळीचा सण साजरा करताना दिसल्या.
सर्व महिला खेळाडू होळीच्या रंगात रंगून गेल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय खेळाडूंसोबत विदेशी खेळाडूंनीही होळीचे ग्रँड सेलिब्रेशन केले.
संघाची कर्णधार स्मृती मानधना आणि स्टार विदेशी खेळाडू अॅलिसा पेरीपासून सर्व खेळाडूंचे गाल गुलालाने रंगलेले दिसले.
महिला प्रीमियर लीग 4 मार्च रोजी सुरू झाली आहे.