- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
बुरूज ढासळतोय; किल्ले यशवंत गडच्या तटबंदीलाही धोका

राजापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची साक्ष देणार्या अनेक गडकिल्ल्यांमध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील नाटे येथील किल्ले यशवंत गडाचा समावेश होतो. तत्कालीन स्थापत्यशास्त्र आणि दूरदर्शीपणाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याचा काही भाग सध्या ढासळला असून किल्ल्याला झाडेवेलींचा विळखा पडला आहे. विविध संघटना, स्थानिक ग्रामस्थांसह शिवप्रेमींकडून किल्ल्याच्या परिसराची गेल्या काही वर्षापासून साफसफाई केली जात असली तरी किल्ल्याची डागडूजी करणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यासाठी शासनासह पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेतल्यास स्वराज्याच्या पाऊलखुणांचे जतन आणि संवर्धन होणार आहे.

हा किल्ला नेमका कोणी आणि कधी बांधला याविषयी फारशी माहिती नाही. नाटे येथे हा किल्ला उभा आहे. या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला जैतापूर खाडीच्या पाण्याने वेढलेले दिसते. प्राचीन जैतापूर आणि मुसाकाजी बंदरासह आणि जैतापूर खाडीतून होणार्या व्यापारी मालवाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण किल्ला जांभा खडी व दगडांच्या चिर्यांनी बांधलेला असून किल्ल्याच्या उत्तर आणि पूर्वेकडील सपाटीच्या बाजूने खोल खंदक खोदून संरक्षित करण्यात आलेला आहे. या खंदकात पाणी नसले तरी सपाटीकडून किल्ल्यावर चढाई करण्यासाठी शत्रू आल्यास त्याला अडथळा यावा असे त्याचे नियोजन केलेले दिसते. किल्ल्यामध्ये एका वास्तूचा चौथरा दिसून येत असून त्याच्यासमोर उंच बुरूज आहे.

बुरुजास पायर्यांनी वर चढल्यावर एका इमारतीचे बांधकाम दिसून येते. येथून गडावर नियंत्रण ठेवले जात असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच परिसरामध्ये दोन कोठारे आणि विहीर आहे. बालेकिल्ल्याच्या दक्षिण बाजूच्या पडकोटातील दरवाजाच्या अलीकडे तटबंदीच्या बुरुजाच्या आतील बाजूस गणेशमूर्ती आणि दोन कमळ प्रतिमा आहेत. सुमारे सात हेक्टर क्षेत्र परिसर असलेला या किल्ल्याचे बांधकाम तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असले तरी ते ठिकठिकाणी ढासळले आहे. तटबंदीमध्ये अनेक मोठमोठी झाडे वाढली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रामाची साक्ष देणार्या किल्ले यशवंत गडाच्या संवर्धनासाठी शासनाकडून कोणताही भरीव निधी मंजूर केलेला नाही. त्यामुळे अद्यापही किल्ले यशवंतगडचे संवर्धन वा डागडूजी झालेली नाही. त्यासाठी जास्तीत जास्त शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.