Jalgaon Road Construction : जळगावमधील रस्ते होणार चकाचक; रस्त्याच्या कामासाठी 100 कोटी रूपये मंजूर

Road Construction
Road Constructionesakal

Jalgaon Road Construction : शहरातील रस्त्याच्या कामासाठी सरकारने शंभर कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यापैकी ५२ कोटी रूपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आले.

दिवाळीपूर्वी १९२ रस्ते चकाचक होतील. मंत्रालयातून कामांना मंजुरी मिळाली, परंतु नाशिकच्या सार्वजनिक बांधकामकडून मंजुरीची प्रतीक्षा होती. (100 crore sanctioned for road work in jalgaon news)

आमदार सुरेश भोळे यांनी त्यासंबंधीची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आदेश जारी केले. २७ आणि २७ कोटी रूपयांचा निधी दोन टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला. एकूण २५७ रस्त्यांची कामे होती. त्यापैकी पहिल्या टप्प्या १९२ रस्त्यांची कामे होतील.

नगरोत्थानमधून वेगळी कामे

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी २०१८ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान योजनेंतर्गंत १०० कोटी रूपये मंजूर केले होते.

Road Construction
Jalgaon Tribal March : अनुसूचित जमाती आरक्षणात इतर जातींचा समावेश नको; आदिवासी आरक्षण हक्क समितीचा आक्रोश मोर्चा

त्यापैकी ४२ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली होती. त्यापैकी ९ कोटी रुपये सरकारने आतापर्यंत दिले. निधीचा पुढील टप्पा वितरीत होत नसल्याने मक्तेदाराकडून काम बंद करण्यात आले होते.

महापालिकेचे शहर अभियंता यांनी नगरविकास विभागाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर १३ कोटींचा निधी देण्याचे नगरविकासकडून स्पष्ट करण्यात आल्याने ४२ कोटींमधील थांबलेली कामे सुरु होतील. ही कामे सार्वजनिक बांधकामकडून करण्यात येतील.

Road Construction
Jalgaon News : ‘झेडपी’च्या 14 कोटींच्या 53 कामांचे कार्यादेश; जिल्हाधिकाऱ्यांसह ‘सीईओं’च्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com