
Corona Update : 12 नवे रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या पोचली 36 वर
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (corona) आलेख वाढतच असून गुरुवारी (ता. २३) पुन्हा नव्या १२ रुग्णांची (patients) नोंद झाली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता ३६ वर पोचली आहे. (12 new patients active patient reached 36 Jalgaon Corona Update news)
हेही वाचा: जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीला तब्बल 16 वर्षांनंतर अटक
राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता व्यक्त होतेय. राज्यात दररोजचे रुग्णही वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दररोजच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या. आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यातही रुग्ण वाढू लागले आहेत. गुरुवारी प्राप्त अहवालात नव्या १२ रुग्णांची नोंद झाली, तर एकमेव रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ३६ वर पोचली आहे. नव्या रुग्णांमध्ये जळगाव शहरात ५, भुसावळ ६ व चोपडा तालुक्यात १ रुग्ण समोर आला. असे असले तरी यापैकी ३४ रुग्ण घरीच उपचार घेत असून केवळ २ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व ३६ सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.
हेही वाचा: कानळदा, फुपनगरी एसटी बस अद्यापही बंद; विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय
Web Title: 12 New Patients Active Patient Reached 36 Jalgaon Corona Update News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..