
Jalgaon : तहसिलदार कार्यालयात बारा वाहनांचा लिलाव; 19 लाख वसूल
जळगाव : अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेली, मात्र दंड न भरलेल्या तब्बल १६ वाहनांचा लिलाव आज (ता. ४) तहसिल कार्यालयात झाला. त्यातील बारा वाहनांचा लिलाव झाला आहे. त्यातून १९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित वाहनांचा पुन्हा लिलाव करण्यात येणार आहे.
सकाळी अकराला जळगाव तहसिलदार कार्यालयात वाहनांचा लिलाव तहसिलदार नामदेव पाटील, नायब तहसिलदार दिलीप बारी यांच्या उपस्थितीत झाला.
लिलावासाठी १८ वाहने ठेवली होती. त्यात डंपर, ट्रॅक्टर, ट्रक यांचा सामावेश होता. त्यांची एकूण किंमत ३७ लाख ९५ हजार ४७८ एवढी होती. त्यापैकी बारा वाहनांचा लिलाव होऊन अपेक्षीत दंड वसुलीच्या १९ लाख १९ हजारांची वसुली झाली.
हेही वाचा: नवा घोटाळा, जुने आरोप... सोमय्यांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरे!
लिलाव झालेली वाहने अशी
ट्रॅक्टर- एमएच १९-बीजी-१०५३, एमएच १९-एएच ५२५०, एमएच १९ एएन ४६७०, क्यूएसीएल ४०६०६००२९४७, एमएच १९ बीजी ५०१८, डब्लयूक्यूए ४०६०६१२३७७०, एमएच १९ सीव्ही ०५१०, डब्ल्यूएक्ससीके ४०६२२१०६३३०, एमएच १९ एपी ५१६४. ट्रक- एमएच १० ए-९७३०, डंपर- एमएच १९ झेड ५७३३, एमएच १९ झेड ३९१९.
हेही वाचा: व्हॉट्स अपवर मेसेज टाकून ज्येष्ठ वकिलाला घातला गंडा
Web Title: 12 Vehicles Auctioned At Tehsildar Office Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..