Drowning Incident : नगरपरिषदेच्या जलतरण तलावात पंधरा वर्षे बालकाचा बुडून मृत्यू
Swimming Pool Tragedy : सोनबर्डी येथील नगर परिषद जलतरण तलावात पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. जामनेर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला.
जामनेर : सोनबर्डी येथील नगर परिषदेच्या जलतरण तलावाच्या पाण्यात एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.