
Jalgaon News : मनुष्याच्या जीवनातील कोणताही अपघात हा कमी- अधिक स्वरूपामध्ये हानी करणाराच असतो. काहींना तर अपघातात पाय गमवावा लागतो तर काहींना हात गमवावा लागतो. काहींचे एवढे दुर्दैव असते, की त्यांना दोन्ही हात अथवा दोन्ही पाय गमवावे लागतात. (150 persons with disabilities were transplanted with artificial limbs jalgaon news)
अशा दिव्यांग व्यक्तींना बघितल्यास डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. अशा दिव्यांग व्यक्तींना सुखाची किनार मिळावी, या उद्देशाने नुकतेच कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण शिबिर घेण्यात आले.
(कै.) सुंदरबाई बन्सीलाल अग्रवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नारायण सेवा संस्थान (उदयपूर) व जिल्हा अग्रवाल संघटन (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे १५० दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण करण्यात आले. ज्यावेळेस त्यांना हे कृत्रिम हातपाय लावण्यात आले, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही सुंदरबाई अग्रवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते या दिव्यांग व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या वेळी खानदेश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, नारायण सेवा संस्थानचे कॅम्प इन्चार्ज हरिप्रसाद लठ्ठा, जिल्हा अग्रवाल संघटनचे पवन मित्तल व सुरेश अग्रवाल, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट दिलीप गांधी व प्रेसिडेंट प्रतीक जैन आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी नारायण सेवा संस्थानतर्फे होत असलेल्या कार्याचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक सीए नीरज अग्रवाल यांनी प्रास्ताविकातून नारायण सेवा संस्थान यांनी केलेल्या कार्याची माहिती करून दिली. या वेळी मंत्री अनिल पाटील व जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.