Jalgaon News : मार्चमधील पावसाची 20 कोटींची नुकसानभरपाई

Funding
Fundingesakal

Jalgaon News : राज्यात मार्च महिन्यात विविध जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिके व इतर नुकसानभरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी, ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील १८ हजार ३६४ शेतकऱ्यांना २० कोटी, ४२ लाख, ६१ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. (18 thousand 364 farmers will get compensation of 20 crores jalgaon news)

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी (ता. १०) निधी वितरणाचा शासन निर्णयही काढण्यात आला.

४ ते ८ मार्च व १६ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून, पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्रासाठी विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Funding
Anandacha Shidha : जिल्ह्यात 54 टक्के लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप

मार्चमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार सोमवारी राज्य शासनाकडून १७७ कोटी, ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला.

महसूली विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधी असा : अमरावती विभाग- २४ कोटी ५७ लाख ९५ हजार रुपये, नाशिक विभाग- ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग- पाच कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजीनगर- ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपये. एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपये.

Funding
Jalgaon News : मेहरूणमध्ये अमृत योजनेची जलवाहिनी फुटली; उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com