Jalgaon Crime News : सिनेस्टाईल पाठलाग करून 2 दरोडेखोर ताब्यात; पोलिस पथकाची कारवाई

Suspects arrested from Erandole Scorpio
Suspects arrested from Erandole Scorpioesakal

Jalgaon Crime News : पारोळ्याचे पोलिस उपनिरीक्षक राजीव जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहनाचा सुमारे दीड तास पाठलाग केला.

भडगाव येथे त्या र वाहनाने शासकीय वाहनास धडक दिली. नंतर पोलिसांनी स्कार्पिओ (एमएच १८, डब्ल्यू ०६७०)सह दोघांन ताब्यात घेतले, तर त्यांचे अन्य साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. (2 robbers arrested after Cinestyle chase Action of police team Jalgaon Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार कोळी, राठोड, मिस्तरी यांच्यासह रात्रीची गस्त घालत होते. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले.

पोलिस पथकाने तिला थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने नेले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. उपनिरीक्षक जाधव यांनी एरंडोलचे उपनिरीक्षक शरद बागल यांना एरंडोलला नाकाबंदी करण्यास सांगितले.

उपनिरीक्षक बागल यांनी हवालदार संतोष चौधरी, किरण पाटील यांच्यासह धरणगाव चौफुलीवर बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली. हवालदार संदीप पाटील व सपकाळे यांनी कासोदा रस्त्यावर थांबले. दत्त मंदिराजवळील रस्त्याने वाहन वळवून दरोडेखोरांनी कासोदाकडे पलायन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Suspects arrested from Erandole Scorpio
Pune Crime: धक्कादायक! वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या

संशयित वाहन कासोद्याकडे गेल्यामुळे उपनिरीक्षक बागल यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. कासोद्याचे उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांना नाकाबंदी करण्यास सांगितले. स्कार्पिओ चालकाने कासोद्यात बॅरिकेट्स उडवून आडगावमार्गे भडगावकडे पलायन केले.

उपनिरीक्षक बागल यांनी भडगावचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांना माहिती दिली. निरीक्षक पाटील यांनी भडगाव येथे नाकाबंदी केली. पोलिसांनी भडगावला स्कार्पिओ थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने भडगाव पोलिसांच्या वाहनास धडक दिली.

सुदैवाने कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही. पोलिसांनी स्कार्पिओसह दोन संशयितांना ताब्यात घेतले, तर त्यांचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी दोन्ही संशयितांची चौकशी केली असता, ते गुरे चोरणारे टोळी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. संशयितांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Suspects arrested from Erandole Scorpio
Child Marriage : 4 दिवसांत रोखले तब्बल 5 बालविवाह! नंदुरबार पोलिसांकडून मोहीम अधिक तीव्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com