देशभरात ATM फोडणाऱ्या टोळीतील दोघं संशयित ताब्यात

jalgaon crime news
jalgaon crime newsesakal
Updated on

जळगाव : जिल्‍ह्यातील विविध गाव तालुक्यांसह महाराष्ट्रात आणि देशभरात एटीएम मशिन फोडून रोकड लांबवणाऱ्या हरियाणातील टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि संशयितांच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवून गुन्हे शाखेने दोघांना अटक केली असून गुन्हे शाखा त्यांच्या टोळीतील इतर गुन्हे गारांच्या मागावर आहे. जिल्ह्यात‍ जामनेर बोडवड, कासोदासह जवळपास सर्वच ठिकाणी गॅसकटरने एटीएम फोडल्याचे गुन्हे या टोळीने केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. (2 suspects in gang that broke ATM across country are in custody Jalgaon Latest marathi news)

जामनेर येथील काही तरूण हरीयाणा राज्यात जाऊन कापसाचा व्यवसाय करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करत तांत्रिकदृष्ट्या या तरुणांवर सर्वेलन्स ठेवण्यात आले.

तपासाकरिता दोन पथके नियुक्त करून माहिती संकलित करण्यास सुरवात केल्यावर उपनिरीक्षक अमोल देवढे, अश्रफ शेख, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, दीपक पाटील, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, कृष्णा देशमुख, भगवान पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, अशोक पाटील आदींच्या पथकाला जामनेरात राहणारे हे तरुण मुळ हरियाणा राज्यातील असून कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी जामनेर येथे रहायला आल्याचे आढळून आले. पथकाने शेख शोएब शेख (रा. मदनीनगर) याला ताब्यात घेतल्यावर चौकशी दरम्यान त्याने महत्त्वपूर्ण माहितीची उकल केली.

jalgaon crime news
तुम्ही रस्त्यांवरून फिरत नाही का?; आयुक्तांचा ठेकेदारांना सवाल

पोलिस खाक्या...अन्‌

शेख शोएब शेख रफीक (रा. मदनीनगर, जामनेर) याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चक्क आमच्या गावातील (हरियाणा) येथील काही तरुण आमच्याकडे येऊन राहतात व थोड्या दिवसांनी ते निघून जातात. त्यांनी मला सोबत नेवून नेरी, कासोदा, बोदवड या गावातील एटीएम मशीन गॅस कटरने कापून गुन्हा केल्याची शेख शोएब याने कबुली दिली.

जामनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात ४३ हजार ५०० रुपये, कासोदा येथील गुन्ह्यात ९ लाख ५५ हजार, बोदवड येथील गुन्ह्यात ३१ लाख १० हजार असे एकूण ४१ लाख ८ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची माहिती शोएबने दिली.

पोलिस प्रसाद बसल्यावर त्याने त्याच्या इतर साथीदारांची नावे सांगितली असून त्या माहितीच्या आधारे हरियाणा राज्यातून वारीस उर्फ कालू जलाल खान (रा. खिल्लुका, ता. हातीन जि. पलवल, हरीयाणा) यास अटक करण्यात आली. अटकेतील दोघांना पुढील तपासाकरिता जामनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

jalgaon crime news
घोटीकरांची वणवण; गढूळ पाण्याने ‘फिल्टर प्लांट’च्या अडचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com