दुचाकीला लाथ मारून 3 लाखांची रोकड लांबविली | Latest Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Theft latest crime news

दुचाकीला लाथ मारून 3 लाखांची रोकड लांबविली

जळगाव : कुरिअरचे पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या मोटारसायकलला (Bike) मागून ट्रिपल सीट येणाऱ्या भामट्यांनी लाथ मारून तीन लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून (Stolen) नेली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पिंप्राळा रोड परिसरातील गुड्डूराजानगरातील प्रमोद विठ्ठल घाडगे (वय ५८) यांचा कुरिअरचा व्यवसाय आहे. (3 lakh cash was stolen by kicking bike jalgaon Latest Crime News)

हेही वाचा: नाशिकमध्ये OBCच्या एका जागेत घट; 36 ऐवजी 35 नगरसेवक

शुक्रवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास घाडगे दुचाकी (एमएच १९, पी ९५२१)ने घरी जाण्यासाठी निघाले. या वेळी मागून दुचाकी (३३५४)वर ट्रिपल सीट आलेल्या तरुणांपैकी एकाने घाडगे यांच्याजवळील बॅग हिसकाण्याचा प्रयत्न केला.

घाडगे यांनी त्याला प्रतिकार केला असता, त्या तरुणाने घाडगेंच्या दुचाकीला लाथ मारताच ते दुचाकीवरून खड्ड्यात पडले व त्यांच्या हातातील तीन लाख रुपये ठेवलेली बॅग या भामट्यांनी लांबविली.

घाडगे गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा: देवळाली, भगूरचे महापालिकेत विलीनीकरण शक्य?

Web Title: 3 Lakh Cash Was Stolen By Kicking Bike Jalgaon Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..