
Jalgaon News : 3 वर्षीय चिमुरड्यावर कुत्र्यांचा हल्ला; अतिदक्षता विभागात उपचार सुरू
जळगाव : शहरातील ममुराबाद रोडवरील उस्मानिया पार्क परिसरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. गुरुवारी (ता. २२) सायंकाळी सातच्या सुमारास अंगणात खेळत असताना, तीन वर्षीय बालकावर एकाच वेळेस आठ ते दहा मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. जखमी बालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शहरातील उस्मानिया पार्क विस्तारित परिसर आहे. या भागातून लेंडीनाला वाहतो. नवीन वसाहत असल्याने नाल्याच्या काठावर मोकाट कुत्र्यांचा दिवसभर वावर असतो. (3 year old boy attacked by dogs Treatment started in intensive care unit Jalgaon News)
हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
हेही वाचा: Jalgaon Crime News : मेहुणबारे परिसरातील 3 वीजचोरांवर गुन्हे दाखल
गुरुवारी सायंकाळी मोहंमद फैज (वय ३) घराजवळ अंगणात खेळत असताना, आठ ते दहा कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. बालकाच्या दोन्ही मांड्या, कंबर, पाठ, छातीसह हातांवर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत कुटुंबियांनी त्याला घेऊन जिल्हा रुग्णालय नेले.
रुग्णालयात तब्बल दोन तास त्याची तपासणी केल्यानंतर बालकाच्या किडण्यांनाही इजा झाल्याचे डॉक्टरांना तपासणीत आढळून आले. डॉक्टरांनी ४८ तासांसाठी बालकाला निरीक्षणाखाली ठेवले आहे. एकुलता एक मुलगा गंभीर जखमी झाल्याने कुटुंबियांचा आक्रोश सुरू होता.
दरम्यान, जळगाव महापालिकेत कुरघोड्यांचे राजकारणामुळे नागरिकांना मुलभूत सुविधाही पुरविल्या जात नाहीत. तिथं मोकाट कुत्र्यांचे काय? कागदावर निर्बिजीकरणाचे टेंडर निघते. कोट्यवधी रुपये खर्च होतात, तरी मोकाट कुत्र्यांवर प्रभावी उपाय अद्यापही सापडत नाही. नित्याच्या घटनांनी नागरिक हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा: Dhadkan Crime Case : गुन्हे शाखेकडून दुसऱ्या संशयितला अटक