Jalgaon News : लोहारा-कुऱ्हाड सर्कलमधील रस्त्यांसाठी 40 कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officials present at the press conference.

Jalgaon News : लोहारा-कुऱ्हाड सर्कलमधील रस्त्यांसाठी 40 कोटीचा निधी

लोहारा (जि. जळगाव) : जामनेर विधानसभा क्षेत्राशी जोडण्यात आलेल्या लोहारा- कुऱ्हाड सर्कलमधील गावांच्या रस्त्यांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी राज्याचे ग्रामविकासमंत्री

गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. (40 crore fund for roads in Lohara Kurhad circle Approved under Chief Minister Gram Sadak Yojana through Girish Mahajan jalgaon news)

याबाबत लोहारा -कुऱ्हाड भाजप गटनेते संजय पाटील यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. या वेळी विकासो अध्यक्ष शरद सोनार, युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, जगदीश तेली, नितीन गवळी उपस्थित होते.

लोहारा-कुऱ्हाड सर्कलमधील कुंभारखान ते कळमसरे ते चिलगाव तालुका हद्द रस्ता, सांगवी वरखेडी रस्ता उतावळी नदीवरील पुलासह, लोहारी ते साजगांव रस्ता, कळमसरे ते एकुलती तालुका हद्द, लाख ते नाईकनगर रस्ता, गोराडखेडा-वडगाव बुद्रुक, असेरी वडगाव टेक ते

प्रजिमा रस्ता, कुऱ्हाड ते कोकडी रस्ता, कुऱ्हाड ते वडगाव आंबे, कुऱ्हाड खुर्द -कुऱ्हाड बुद्रुक लाख रामेश्वर ते लोहारा-तालुका हद्द एकुलती रस्ता तर एकमेव, कासमपुरा ते नांद्रा रस्ता नाबार्डमधून या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

अशा लोहारा-कुऱ्हाड सर्कलमधील गावांच्या रस्त्यांची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. यामुळे वाहनधारक, शेतकरीबांधव त्रस्त झाले होते. तर काही रस्ते हे सोईचे असल्याने वाहनधारक यांच्या वेळेचीही बचत होणार आहे. शेतकरी बांधवांना दळणवळणासाठी फायदेशीर ठरणार आहेत.

रस्त्यांचा कायापालट होणार असल्याने गावांतील नागरिक, शेतकरी, वाहनधारकांनी मंत्री महाजन यांच्या भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. या वेळी पत्रकारपरिषदेला लोहारा-कुऱ्हाड भाजप गटनेते संजय पाटील, विकासो चेअरमन शरद सोनार, ग्रामपंचायत सदस्य

कैलास चौधरी, नितीन गवळी, जगदीश तेली, किसन पाटील, डॉ. सुभाष घोंगडे, किरण पाटील, सुनील क्षीरसागर, संजय उशिर, राहुल कटारिया, विकास देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपक खरे, नंदू सुर्वे, आदेश वाघ, शिवराम भडके, अतुल कोळी, भास्कर भोई, भगवान खरे, बाजीराव माळी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.