Latest Marathi News | भुसावळातील 5 जण जिल्ह्यातून ‘हद्दपार’; आणखी उपद्रवींवर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

jalgaon : भुसावळातील 5 जण जिल्ह्यातून ‘हद्दपार’; आणखी उपद्रवींवर होणार कारवाई

भुसावळ : शहरातील गौरव बढेसह टोळीतील अन्य तीन सदस्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तर एकास एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तत्कालीन अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबतचे आदेश काढले होते. दरम्यान, हे आदेश संबंधित पोलिस ठाण्यांना शनिवारी (ता. १२) प्राप्त झाले.

शहरातील गौरव सुनील बढे, जितू शरद भालेराव, सचिन अरविंद भालेराव, भावेश कांतिलाल दंडगव्हाळ या चार जणांना दोन वर्षांसाठी व कृष्णा प्रकाश खरारे यास एका वर्षासाठी हद्दपार केले आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी हद्दपार केले असून, त्याबाबतचे आदेश २८ सप्टेंबरला काढले आहेत. (5 people from Bhusawal deported from district Action taken on more nuisance Jalgaon Crime News)

हेही वाचा: Eknath Khadse Statement : सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

हे आदेश संबंधित पोलिस ठाण्यांना शनिवारी (ता. १२) प्राप्त झाले. दरम्यान, पालिका निवडणुकीपूर्वी अजूनही काही उपद्रवींना हद्दपार करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

गुन्हेगारी टोळीतील गौरव बढेविरोधात दंगा, खुनाचा प्रयत्न करणे, हाणामारी, शस्त्र बाळगणे, गोळीबार करणे आदी गुन्हे शहर पोलिसात गुन्हे दाखल आहेत तर जितू भालेराव, सचिन भालेराव, भावेश दंडगव्हाळ यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, दंगा करणे, मारहाण करणे, शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. शिवाय जितू भालेराव याच्याविरुद्ध २०२० मध्ये हाणामारीचा तर भावेश दंडगव्हाळ याच्याविरुद्ध अत्याचार, खुनाचा प्रयत्न, पळवून नेणे आदी गुन्हे दाखल आहे.

हेही वाचा: Jalgaon : Fournier gangreneच्या रुग्णावर गुंतागुंतीची Surgery यशस्वी