Lumpy प्रतिबंधासाठी 93 टक्के लसीकरण; 5 हजार बाधित गुरांवर उपचार सुरू

Lumpi vaccination reference image
Lumpi vaccination reference imageesakal

जळगाव : गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या लम्पी आजाराला प्रतिकार करण्यात जळगाव जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. रविवारपर्यंत जिल्ह्यात ९३ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.(93 percent vaccination for Lumpy disease prevention completed Jalgaon news)

त्यासोबतच सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असून, पशुपालकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

जिल्ह्यात ‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारी घेण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या उपाययोजना जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाच लाख ७१ हजार ५३ पशुधनापैकी पाच लाख १८ हजार ३६४ पशुधनाचे लसीकरण रविवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.

Lumpi vaccination reference image
Jalgaon : जिल्ह्यात ‘नरेगा’ कामांमध्ये गडबड

दररोज २० हजार पशूंचे लसीकरण

दररोज १५ ते २० हजार पशूंचे लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे. सोबतच हा संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून चराईबंदी जिल्हाभरात करण्यात आली आहे. बचतगटांमार्फत पशुसखी, कृषिसखी यांच्या माध्यमातून जिल्हाभरात पशूंचे सर्वेक्षणदेखील करण्यात येत आहे.

पाच हजार पशू बाधित

सध्या जिल्ह्यात चार हजार ९९८ बाधित पशू आढळून आले आहेत. यांपैकी एक हजार ७८१ जनावरे उपचाराअंती बरी झाली आहेत, तर तीन हजार २१७ पशूंवर उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.

Lumpi vaccination reference image
Jalgaon : शहरातील पार्किंगमधील कार लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com