Marathi Sahitya Sammelan : प्रताप महाविद्यालयात 97 वे मराठी साहित्य संमेलन : डॉ अविनाश जोशी

Marathi Sahitya Sammelan
Marathi Sahitya Sammelanesakal

Jalgaon News : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर साहित्य नगरीत घेण्यास अखिल भारतीय साहित्य मंडळाने मान्यता दिल्याने आम्ही आतापासूनच तयारीला लागलो असून प्रताप महाविद्यालयाचे स्थळ निश्चित झाले आहे. (97 th Marathi Literary Conference at Pratap College amalner jalgaon news)

संमेलनाचा खर्च आणि स्वरूप मोठे असल्याने खानदेशातील तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि विविध शैक्षणिक संस्थांचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनाच्या नियोजनसंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन नांदेडकर सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सर्व कार्यकारी सदस्य उपस्थित होते. डॉ. जोशी म्हणाले, की १९५२ नंतर पुन्हा अमळनेरात हे संमेलन होतेय याचा आनंद आहे. यासाठी आमचे खूप प्रयत्न सुरू होते. स्थळ पाहणी समितीला अमळनेरचे नियोजन योग्य वाटल्याने त्यांनी आपली बाजू लावून धरली होती, अखेर महामंडळाने आपल्यालाच संधी दिली आहे.

नियोजनात संमेलनाचे तीन केंद्र असणार असून प्रामुख्याने संमेलन स्थळ, निवास व्यवस्था व स्वच्छतागृह, दळणवळण विचारात घेतले आहे. अमळनेरातील महत्त्वाची हॉटेल्स, काही मंगल कार्यालय मिळून दोन हजार ते अडीच हजार लोकांची सोय होऊ शकते, काही व्यवस्था धुळे येथील देखील करण्याचे नियोजन आहे. भोजन व्यवस्थेत पंचपक्वान्न न ठेवता खानदेशी मेनू वर भर असणार आहे. या शिवाय खानदेशी बोली भाषा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर आधारित थीम संमेलनात असणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Marathi Sahitya Sammelan
Marathi Sahitya Sammelan : अमळनेरात तब्बल 72 वर्षांनी भरणार साहित्याचा मेळा!

साहित्य उदात्तीकरण सोबत सर्वांगीण विकासही साधणार

डॉ. जोशी म्हणाले की या साहित्य संमेलनामुळे अमळनेर व खानदेशचे साहित्य उदात्तीकरण तर होणारच मात्र अमळनेरची व्यावसायिक वृद्धी व्हावी, हा देखील उद्देश असून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय अमळनेर येथील बाहेरगावी गेलेले उच्चपदस्थ व्यक्ती तसेच महाविद्यालयीन तरुण- तरुणी यांना सहभागी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारकडून ५० लक्षचा निधी

या संमेलनासाठी खर्च खूप मोठा असून शासनाकडून ५० लक्ष मिळण्याची तरतूद असली तरी २ कोटीपर्यंत निधी मिळविण्याचा प्रयत्न आहे, तसेच स्थानिक आमदार व खासदार यांच्या निधीतून काही निधी मिळू शकेल, या शिवाय तिन्ही जिल्ह्यातील संस्था, इंडस्ट्रीज यांच्यासह काही लहान दात्यांकडून यथाशक्ती मदत घेऊन जास्तीत जास्त निधी जमा होऊ शकतो, निधी घेताना प्रत्येकाला पावती दिली जाईल, तसेच या कामी स्थानिक प्रशासनास सहभागी करणार असून प्रताप कॉलेज नेही मोठी जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. आज ढोबळ नियोजन केले असून सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत अंतिम नियोजन केले जाईल, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

सानेगुरुजी पुतळ्याजवळ आनंदोत्सव

पत्रकार परिषद आटोपल्यावर सर्वांनी पूज्य सानेगुरुजी यांच्या पुतळ्यास अभिवादन व माल्यार्पण करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अध्यक्ष डॉ. जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, भय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा.शीला पाटील, शिवाजीराव पाटील, खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, संचालक नीरज अग्रवाल, नगरपालिकेचे संजय चौधरी, दिनेश नाईक, संभाजी पाटील, राजू फफोरेकर, निवृत्त पोलिस निरीक्षक कंखरे, हेमंत भांडारकर, रामकृष्ण पाटील यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

Marathi Sahitya Sammelan
Chalisgaon Market Committee Election : दिग्गजांनी दंड थोपटल्याने चुरस; आरोपांच्या फैरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com