जळगाव : लाचखोर मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ACB arrested the corrupt principal in jalgaon

जळगाव : लाचखोर मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात

चाळीसगाव (जि. जळगाव) : विद्यार्थ्याच्या इयत्ता बारावी निकालाच्या प्रमाणपत्रासह बोर्ड सर्टिफिकेटवर आईचे नाव चुकल्याने ते दुरुस्त करण्याच्या मोबदल्यात वडगाव (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील मुख्याध्यापकाला पालकाकडून एक हजाराची लाच स्वीकारताना त्याच्या चाळीसगावच्या निवासस्थानी मुद्देमालासह पकडले. ही कारवाई जळगावच्या लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केली.

तरवाडे (ता. चाळीसगाव) येथील तक्रारदार अपंग असून, त्यांचा मुलगा चाळीसगावपासून जवळच असलेल्या वडगाव (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील श्री. ना. धो. महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून २०२१ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या निकालाचे प्रमाणपत्र आणि बोर्डाच्या सर्टिफिकेटवर आईचे नाव चुकीचे असल्याने नावात दुरुस्तीसाठी मुख्याध्यापक राजेंद्र भास्करराव पाटील (रा. भगवती हौसिंग सोसायटी, मालेगाव नाक्याजवळ, चाळीसगाव) यांना पालकाने विनंती केली. सुरवातीला मुख्याध्यापक पाटील यांनी १५०० रुपये लागतील, म्हणून सांगितले. तक्रारदाने ते देण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांनी दोन हजारांची मागणी केली. तक्रारदाराने मागणीनुसार दोन हजार रुपये शाळेत जाऊन दिले. तरीही त्यांना अपेक्षित असलेले निकालपत्र व सर्टिफिकेट मिळाले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक पाटील यांना तक्रारदाराने पुन्हा विचारणा केल्यानंतर त्यांनी आणखी एक हजार रुपये चाळीसगावला घरी घेऊन येण्यास सांगितले. अपंग असलेले तक्रारदार मुख्याध्यापकांच्या अशा वागण्यामुळे त्रस्त झाल्याने त्यांनी थेट जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ठरल्यानुसार, तक्रारदार एक हजार रुपये मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांना देण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता, लाचलुचपत विभागाने सापळा रचून त्यांना स्वत:च्याच घरात एक हजाराची लाच स्वीकारताना पकडले.

हेही वाचा: जळगाव : कर्जबाजारी शेतकऱ्याची आव्हाणेत आत्महत्या

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, महिला कर्मचारी शैला धनगर, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांनी केली. पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा: जळगाव : पाचशेची नोट दाखवत विवाहीतेचा विनयभंग

Web Title: Acb Arrested The Corrupt Principal In Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonbribeprincipal
go to top