वाहक चालकाची सतर्कता; आणि प्रवाशांचे वाचले प्राण 

अमोल अमोदकर
Saturday, 9 January 2021

खोलगट भागात गाडी पल्लटी होऊन मोठा अपघात होऊ शकत होता आणि प्रवाशाच्या जिवावर बेतणारा प्रसंग होत होता.

जळगाव ः बोदवड येथून शुक्रवारी दुपारी बोदवड जळगाव ही एसटी बस क्रमांक एम.एच. 19 बी. एल. 15 96 ही बस परत जळगाव येथे जाण्यासाठी किमान 35 ते 40 प्रवासी घेऊन बस स्थानकावरून वाहन चालक जगदीश देवचंद लोखंडे बस घेऊन सुरवाडे मार्गे निघाले. 

आवश्य वाचा- सुसाट वेगावर हवा लगाम; नऊ वर्षांत १६१ जणांचा मृत्‍यू

 

सुरवाडे खुर्दे गावाजवळ रिमझिम पाऊस सुरु असतांना प्रवासी गाडीतून उतरवण्यासाठी गाडीचा वेग कमी करून ब्रेक दाबला असता गाडीचे स्टेरीग लाँक झाले.

 

थोडक्यात वाचले प्राण

गाडी रस्त्याच्या बाजुने खोलगट भागात गाडी पल्लटी होऊन मोठा अपघात होऊ शकत होता आणि प्रवाशाच्या जिवावर बेतणारा प्रसंग होत होता. मात्र वाहनचालक जगदीश लोखंडे यांच्या सावधगिरी मुळे मोठा अनर्थ टळला

बस ट्राॅलीवर आदळली

बस वाहनचालक लोखंडे यांनी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या बंद ट्रक्टर ट्राॅलीवर आदळली. यात बसच्या समोररील बाजुचा काचा फुटल्या.वाहनचालक लोखंडे यांनी आपल्या वरीष्ठान वरोबर चर्चा करून बोदवड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident marathi news bhusawal st bus tractor accident