esakal | कार शिकायला घेवून गेला, नियंत्रण सुटताच झाडावर जावून आदळला 
sakal

बोलून बातमी शोधा

कार शिकायला घेवून गेला, नियंत्रण सुटताच झाडावर जावून आदळला 

पाय ब्रेक एवजी एक्सीलेटरवर गेल्याने कार भरधाव वेगाने काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँके समोरील झाडावर जावून आदळली.

कार शिकायला घेवून गेला, नियंत्रण सुटताच झाडावर जावून आदळला 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः कार शिकायला घेवून गेलेल्या तरुणाचा आज पहाटे शहरातील काव्यरत्नावली चौकात ब्रेकच्या एवजी एक्सीलेटरवर पाय गेल्याने सुसाट कार थेट झाडावर जावून आदळली. एअरबॅग उघडल्याने कारमधील तीन्ही मित्र थोडक्यात बचावले. तर जोरदार धडक बसल्याने झाडाची मोठी फांदी तुटून कारवच पडली.

आवश्य वाचा- जळगावत पून्हा होणार कचरा कोंडी; वेतनाअभावी सफाई कामगारांचे ‘कामबंद’ 

जळगाव शहरातील नंदनवन काॅलनीतील रहिवासी आर. बी. हिंगणेकर यांचा मुलागा रक्षण यांचे काव्यरत्नावली चौकात फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. सकाळी कार शिकण्यासाठी रक्षण त्यांची कार क्रमांक( एम. एच. १९ सी. झेड १५३२) ह कार मित्रांसोबत पहाटे घेवून आला. कार शिकत असतांना रक्षणचा पाय ब्रेक एवजी एक्सीलेटरवर गेल्याने कार भरधाव वेगाने काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँके समोरील झाडावर जावून आदळली. मोठा आवाज झाल्याने पहाटे मॅार्निग वॅाक करणारे अपघात स्थळी धावले. 

एअरबॅग मूळे वाचले तिघांचे प्राण
रक्षणचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने कार अत्यंत वेगात झाडावर जावून आदळली. धडक अत्यंत जोरात असल्याने झाडाची मोठी फांदीच गाडीवर पडली. परंतू धडक बसल्याने गाडीचे उघडलेले एअरबॅग मुळे तिघांचे प्राण वाचले. 

आवर्जून वाचा- अरे व्वा! भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातील गुन्हेगारांवर आता ड्रोनद्वारे वॉच 

झाड तुटल्याने रस्त्यावर वाहतुक कोंडी  
काव्यरत्नावली चौकात सकाळी झालेल्या अपघातात झाड तुटले व त्याची मोठी फांदी रस्त्यावर पडली. त्यामुळे वाहतुक कोंडी काही काळासाठी झाली होती. महापालिकेचे पथक व क्रेनच्या मदतीने फांदी दुर करण्यात आले. 

loading image