Latest Marathi News | वृक्षतोड थांबविण्यात असमर्थ ठरल्याने कारवाई वन विभागाचे 3 कर्मचारी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest officer suspended

वृक्षतोड थांबविण्यात असमर्थ ठरल्याने कारवाई वन विभागाचे 3 कर्मचारी निलंबित

यावल : तालुक्यातील सातपुडा जंगलात होणारी वृक्षतोड थांबविण्यात अकार्यक्षम ठरल्याने येथील पश्चिम वन विभागातील तीन वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. याबाबत गुरुवारी (ता.१८) आदेश काढण्यात आले. (Latest Marathi News)

तालुक्यात सातपुडा जंगलातील पश्चिम वन विभागाच्या वाघझिरा परिमंडळात गेल्या दोन महिन्यात मूल्यवान वृक्षतोड रोखण्यात अकार्यक्षम ठरल्याच्या कारणावरून वाघझिरा बीटचे वनपाल, वनरक्षक व एका वनमजुरासह एकूण तीन जणांना वन विभागाने निलंबित केले आहे. वन विभागाने वाघझिरा बीटचे वनपाल राजेश शिंदे, वनरक्षक डी. वाय. नलावडे, वनमजूर काशिनाथ बेलदार अशा तिघांना तडकाफडकी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम वन क्षत्राचे वनक्षेत्रपाल एस.टी.भिलावे यांनी दिली आहे.

हेही वाचा: आजीचा बटवा: पोटाचा घेर कमी करायचा आहे मग आजीच्या बटव्यातला जिऱ्याचा करा उपयोग

सातपुडा जंगलातील वन विभागातील कार्यक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून सागवानी वृक्षासह इतर मौल्यवान वृक्षाची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू होती. तसेच सागवानी लाकडाचा अवैध व्यवसाय वन विभागाच्या आशीर्वादाने जोमात सुरू असल्याची तालुक्यात चर्चा आहे. एकेकाळी घनदाट वनराईने नटलेला सातपुडा सध्या बोडखा झाला आहे. या कारवाईमुळे वन विभाग कार्यक्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

हेही वाचा: सरकारला स्थानिक जनता महत्वाची की रिफायनरी? राणेंचा ताफा अडवला

Web Title: Action 3 Employees Of Forest Department Suspended For Being Unable To Stop Felling Of Trees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..