Jalgaon Crime News : गावठी दारु पाडणाऱ्या महिलेवर कारवाई

Crime News
Crime Newsesakal
Updated on

अमळनेर : शहरातील कंजरवाडा भागात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीची दारू पाडणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे साडे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बहादरपूर रस्त्यावरील कंजरवाडा परिसरात बिंदीया कंजर ही गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Action taken against woman who spilled liquor of Gavthi Hatbhatti Jalgaon News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Crime News
Jalgaon News : बोरी उजव्या व डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग

त्यानुसार, पोलिसांनी अचानक जाऊन छापा टाकला असता, पाच हजार रुपये किमतीचे २०० लिटर गुळ व नवसागरचे पाणी, ५०० रुपये किमतीची हातभट्टीची तयार दारू असा एकूण साडे पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक गंभीर शिंदे, हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, पोलिस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील व महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे यांच्या पथकाने केली. याबाबत नम्रता जरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिंदीया कंजर हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Jalgaon News : फेब्रुवारीपासून जळगाव विमानतळावरून पुन्हा Take Off

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com