Jalgaon News : वैज्ञानिक दष्टिकोनासह लोकांकडून पक्षीनिरीक्षण; निसर्गमित्र तर्फे उपक्रम

A bird spotted during a bird watching activity organized by Nisarga Mitra.
A bird spotted during a bird watching activity organized by Nisarga Mitra.esakal

जळगाव : निसर्ग मित्र जळगाव व ई-बर्ड इंडियातर्फे यंदाही राबविण्यात आलेल्या कॅम्पस बर्ड काउंट (सीबीसी) आणि ग्रेट बॅकयार्ड बर्ड (Bird) काउंट (जीबीबीसी) या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. (Activities by Nisarga Mitra Birdwatching by public with scientific perspective Jalgaon News)

स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची नोंद आणि काही पक्ष्यांना बोलीभाषेतील नावेही या उपक्रमातून समोर आलीत.यासंदर्भात पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी माहिती दिली. सीबीसीसाठी मागील वर्षी जे कॅम्पस निवडले होते, त्यात पक्षीनिरीक्षण आणि पक्षीगणना केली.

यंदा १७ ते २० फेब्रुवारीदरम्यान दररोज एका ठिकाणी सकाळी सीबीसी आणि दुपारी चारनंतर जीबीबीसी याप्रमाणे गणना केली. सीबीसीसाठी एखाद्या संस्थेचे आवार आणि जीबीबीसीसाठी पाणथळ, नदीकाठ, शेती-गवताळ भाग याशिवाय निवासस्थानाचे परस अंगण, आसपासची अन्य खुली जागा अशा मिश्र ठिकाणी पक्षीनिरीक्षण व पक्षीगणना केली.

स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांची नोंद

या पक्षीगणनेत कावळा, चिमणी, मैना, पोपट, कबूतर, बुलबुल या स्थानिक पक्ष्यांबरोबर गुलाबी मैना, दगडी गप्पीदास, आशियाई आणि लाल छातीचा माशीमार, काळा थिरथिरा, तुताऱ्या, धोबी, चक्रवाक अशा काही देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झाली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

A bird spotted during a bird watching activity organized by Nisarga Mitra.
Jalgaon News : नशिराबाद भागपूर रस्ता भिंत घालून बंद विमानतळ प्राधिकरणाची मनमानी

बोलीभाषेतील नावे अन्‌ बरेचकाही

या चारही दिवसांत विद्यार्थी, महिला कर्मचारी, शेतकरी, कामगार, उच्चशिक्षित अशा विविध वयोगटांतील आणि स्तरातील नागरिकांचा सहभाग होता. बऱ्याच जणांनी काही पक्ष्यांची बोलीभाषेतील नावे सांगितली. काहींनी पक्ष्यांचे वर्तन, त्यांची घरटी याबद्दल माहिती दिली.

पक्ष्यांची मराठी आणि इंग्रजी प्रमाणित नावे याबद्दल फार थोड्या लोकांना माहीत होते. त्यांच्याच परिसरात पक्षीनिरीक्षण केल्याने बहुतेकांनी हे पक्षी आधीही बघितले होते ते कुठे दिसतात, हेही त्यांना माहीत असल्याचे गाडगीळ दांपत्याने सांगितले .

निरीक्षणातून प्राप्त आकडेवारी कॅम्पस बर्ड काउंट

तारीख ----- स्थळ -------------- जाती --- संख्या

१७/२ ---- कण्व आश्रम, कानळदा - ४० ---- २३५

१८/२ ---- स्मृती उद्यान, मेहरुण ---- २५ ---- १०५

१९/२ ---- कचरा डेपो, शिवाजीनगर - ३६ --- २२१

२०/२ ----- कृषी केंद्र, ममुराबाद ---- ३२ ----- १३५

द ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट

१७/२ ---- कण्व आश्रम, कानळदा -- ३३ --- २०४

१८/२ ---- शंभू हिल्स, रायसोनीनगर -- २६ --- १२१

१९/२ --- निमखेडी, गिरणा परिसर ----- ३८ --- १८६

२०/२ --- शिरसोली, पीबी तलाव ---- ३१ ---- ३२०

A bird spotted during a bird watching activity organized by Nisarga Mitra.
Board Exam : इंग्रजीला कॉपी चालली, कारवाई मात्र नाही ! बारावीच्‍या परीक्षेला सुरवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com