
रासायनिक खतांचा पुरेसा पुरवठा करणार : दिलीप सिंघानी
जळगाव : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रायसानिक खतांचा तुटवडा पडू दिला जाणार नाही. जास्तीत जास्त पुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही इफ्को कंपनीचे चेअरमन दिलीप सिंघानी यांनी दिली. जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार यांनी त्यांची भेट घेतली.
इफ्को सहकारी संस्थेची ५१ वी वार्षिक सभा नवी दिल्लीतील एनसीयुआय आडोटोरियम ऑगस्ट क्रांती येथे झाली. या सभेत इफ्कोचे चेअरमन माजी केंद्रीय मंत्री दिलीप सिंघानी, कार्यकारी संचालक डॉ. उदय शंकर अवस्थी यांनी मार्गदर्शन केले. यापूर्वी संस्थेतर्फे कनोल (गुजरात) येथे नॅनो तरल लिक्वीड यूरिया प्लांटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी दिलीप सिंघानी यांनी नॅनो यूरियाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. तसेच नॅनो यूरियाच्या तंत्रज्ञानामुळे या वर्षी सात हजार करोड रुपये केंद्र सरकारचे वाचणार आहेत. २०२५ पर्यंत नॅनो युरियाच्या वापरामुळे आपल्या देशाचे ७५ हजार करोड रुपये वाचणार आहेत. तसेच भविष्यात नॅनो डीएपी व नॅनो १०/२६/२६ यांचेही उत्पादन होणार आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये अशाप्रकारचे सात ते आठ प्लांट तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: कोरोनात व्यवसाय गमावलेल्या गृहस्थाची आत्महत्त्या
सर्व संचालक मंडळ, महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र शिंगणे, जळगाव जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, चोपड्याचे लक्ष्मणराव पाटील, जगन्नाथ पाटील उपस्थित होते.
दरम्यान, सभा संपल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी चेअरमन सिंघानी यांची भेट घेतली. त्यांना जळगाव जिल्ह्यातील रासायनिक खताच्या स्थितीची माहिती दिली. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात खतांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावेळी सिंघानी यांनी पुरेसा खत पुरवठा करण्याची ग्वाही दिली.
हेही वाचा: बेकायदेशीररीत्या बाळ दत्तक घेतल्यास कायदेशीर कारवाई होणार
Web Title: Adequate Supply Of Chemical Fertilizers Dilip Singhani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..