Jalgaon News : शहापूर-शिरसाळे रस्त्यास प्रशासकीय मान्यता

MLA Anil Patil
MLA Anil Patilesakal

अमळनेर : ग्रामीण भागातील दळणवळण वाढावे, यासाठी नव्या रस्त्यांच्या निर्मितीचे प्रयत्न आमदार अनिल पाटील यांनी सुरू केले असताना नुकतीच शहापूर -सबगव्हाण- पाडसे ते झाडी- शिरसाळेपर्यंत जवळपास ९.१४० किलोमीटर रस्त्यासाठी ७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे.

शहापूरकडील गावांना धुळे रस्त्याला जोडण्यासाठी नवा शॉर्टकट मार्ग तयार होणार असल्याने हा मार्ग ग्रामीण जनतेसाठी वरदान ठरणार आहे. या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणार असून, १ फेब्रुवारीला याबाबतचा शासन निर्णय प्रकाशित होऊन प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ( Administrative approval for Shahapur Shirsale road Fund of seven and a half crores due to t efforts of MLA Anil Patil Start work soon Jalgaon News)

MLA Anil Patil
Jalgaon News | खेडीभोकरी ते भोकरदरम्यान तापी नदीवर होणार पूल : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शहापूर-शिरसाळे रस्त्यास प्रशासकीय मान्यताया रस्त्यामध्ये समाविष्ट प्रत्येक गावांच्या हद्दीत कॉंक्रिटीकरण केले जाईल, तसेच लहान नाल्यावर पुलांचे व संरक्षकभिंतीचे बांधकाम देखील करण्यात येईल. हा रस्ता सद्यस्थितीत जेमतेम असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा मार्ग व्हावा, अशी मागणी होत होती.

कारण शहापूर, तांदळी, पाडसे, सबगव्हाण, भोरटेक, चौबारी, जैतपीर आदी अनेक गावांतील लोकांना धुळे, फागणे, नवलनगर किंवा त्या मार्गाकडे जायचे म्हटल्यास अमळनेर मार्गे फेऱ्याने जावे लागत असे. त्यामुळे झाडी, शिरसाळेकडून जवळचा मार्ग व्हावा, असा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती, ती पूर्ण होत नसल्याने प्रवाश्यांना नाईलाजाने अमळनेर मार्गे किंवा आहे त्याच खराब रस्त्याचा वापर करात जावे लागत होते. आमदार अनिल पाटील यांनी या मार्गाचा प्रश्न मनावर घेऊन त्यास निधीची मंजुरी मिळवून आणल्याने मोठा प्रश्न त्यांनी सोडविला आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

MLA Anil Patil
Nandurbar News : पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन द्या; खासदार, मंत्र्यांना निवेदन

आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेल्या रस्त्याला मंजुरी मिळून निधी प्राप्त केला आहे.

असा असेल नवीन मार्ग

शहापूर भागातील प्रवासी अवघ्या २० किलोमीटचा प्रवास करून धुळे रस्त्यावर पोहचू शकणार आहे. धुळे रस्त्याकडून शहापूर परिसरात जाणाऱ्या लोकांना देखील या रस्त्याचा फायदा होणार आहे. यामुळे जवळपास २० किलोमीटरपेक्षा अधिकचा फेरा वाचून वेळेची देखील बचत होणार आहे.

निविदाप्रक्रिया लवकरच

लवकरच या कामाची निविदाप्रक्रिया होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, तसेच या रस्त्याची देखभाल ही ५ वर्षे संबंधित ठेकदाराकडेच राहणार असल्याने किमान पाच वर्षे या रस्त्याचा दुरुस्तीसह प्रश्न मार्गी लागला आहे.

MLA Anil Patil
Political News : आता निवडणुका झाल्यास शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं भाकित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com