Agriculture Update : शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ किलो साखर,दिवाळी भेट

5 Kg Suger Distribution to farmers
5 Kg Suger Distribution to farmers esakal

चोपडा : तालुक्यातील बारामती ॲग्रो लि. युनिट क्रमांक चारने मागील वर्षी २०२१-२२ या गाळप हंगामात चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यास घेतल्यानंतर कमी कालावधीत २ लाख ९३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. त्या गाळपात ऊस पुरवठा केलेल्या ३ हजार ७०६ शेतकऱ्यांना बारामती ॲग्रोकडून दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी ५ किलो साखर मोफत घरपोच गटनिहाय वाटप केली जात असल्याची माहिती बारामती ॲग्रोचे युनिट ४ चे जनरल मॅनेजर मिलिंद देशमुख यांनी दिली आहे.

बारामती ॲग्रो लि. युनिट क्रमांक ४ भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर प्रथमच ऊस पुरवठा करणाऱ्या ३ हजार ७०६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ किलोप्रमाणे १८५ क्विंटल साखरेचे वाटप घरपोच दिले जात आहे.

यासाठी जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील १७ गटांमध्ये प्रत्येक कर्मचारी ही कामगिरी पार पाडत आहे. गत हंगामात कारखानास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागले. यावर्षी बारामती ॲग्रोने योग्य ते नियोजन केल्याने कोणतीही अडचण येणार नसून, ठरलेले उद्दिष्ट वेळेत गाठण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिली आहे.(Agriculture Update Diwali gift of 5 kg sugar each to farmers Jalgaon Agriculture News)

5 Kg Suger Distribution to farmers
Agriculture Update : परतीच्या पावसाने ‘खरीपा’वर फिरले पाणी ; सरसकट भरपाईची मागणी

गटनिहाय साखर वाटप शेतकरी संख्या

शेतकरी संख्या अडावद (२६), अमळनेर (१३५), भडगाव (६०३), चाळीसगाव (१०१३), चहार्डी (५६), चोपडा (२९), धरणगाव (४६), एरंडोल (३), गलंगी (२७७), गरताड (२५१), गोरगावले (१७), हातेड (११८), जाफराबाद (३५०), जळगाव (२), मंगरूळ (८६), रुखनखेडा (३१), शिरपूर (६०९), यावल (५४) असे एकूण ३ हजार ७०६ शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे.

सहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

बारामती ॲग्रो यावर्षीच्या गळीत हंगामात ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणार असल्याची माहिती बारामती ॲग्रो लिमिटेडचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी बॉयलर अग्निप्रदीपन वेळी दिली होती. साखर वाटपासाठी मुख्य शेतकी अधिकारी राजेंद्र देसले, उसविकास अधिकारी अकबर पिंजारी आदी परिश्रम घेत आहेत.

5 Kg Suger Distribution to farmers
पहिली असतांना दुसरीसोबत थाटला संसार ; Mobile Searchingमध्ये ‘अशीही बनवाबनवी ’ उघडकीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com