Jalgaon News : अजिंठा चौफुली रस्त्यावरील भंगार बाजारावर होणार कारवाई

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporationesakal

जळगाव : अजिंठा चौक परिसरातील रस्त्याला लागून असलेला भंगार (Scrap) बाजाराची मुदत संपलेली आहे. त्यामुळे ती जागा ताब्यात घेण्याची कारवाई कोणत्याही क्षणी करण्यात येणार आहे,

अशी माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Dr. Vidya Gaikwad) यांनी दिली. (Ajanta Chaufuli Road Scrap market Municipal Corporation will take over place after term expires jalgaon news)

जर त्या जागेच्या कराराबाबत कागदपत्रे संबंधित व्यावसायिकाकडे असतील तर ती आपल्याकडील सादर करावीत, अशा सूचनाही त्यांनी व्यावसायिकांना केल्या आहेत. नगरसेवक इब्राहिम पटेल यांच्या नेतृत्वात व्यावसायिकांनी सोमवारी (ता. १३) सायंकाळी आयुक्तांची भेट घेतली.

अजिंठा चौफुलीजवळ महापालिका मालकीची जागा भंगार बाजाराला देण्यात आली आहे. या जागेची मुदत २०१८ मध्येच संपलेली आहे. ही जागा ताब्यात घेण्याबाबत फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या महासभेतदेखील ठराव करण्यात आला होता.

त्यानंतर व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या असून, त्यावर महापालिकेतर्फे सुनावणीही घेण्यात आली. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता त्यावर कारवाई करून हा बाजार हटविण्यात येणार आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

jalgaon municipal corporation
Cotton Crop Crisis : कापसाच्या वजनात होतेय घट अन् दर्जाही खालावतोय; शेतकरी कंटाळून आता कापूस विकणार!

भंगार बाजार हटवू नये, यासाठी आज या ठिकाणच्या व्यावसायिकांनी नगरसेवक इब्राहिम पटेल यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले, की भंगार बाजार हटविला तर सर्व व्यावसायिक उघड्यावर येतील.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण होईल. भंगार बाजार हटवू नये, अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. ही जागा महापालिकेने ९९ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आली होती, असेही व्यावसायिकांनी सांगितले. त्यावर आयुक्त डॉ. गायकवाड यांनी त्याबाबत कागदपत्रे असतील तर ती सादर करावीत, असेही व्यवसायिकांना सांगितले.

प्रक्रिया नियमबाह्य ः आयुक्त

याबाबत पत्रकारांना माहिती देताना आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले, की या जागेबाबत कराराची प्रक्रिया ही मुळातच नियमबाह्य पद्धतीने झाली होती. त्यावर कारवाई करण्याबाबतही महासभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून कारवाईत चालढकल केली जात आहे. मात्र आता कोणत्याही क्षणी तेथे जेसीबी नेऊन कारवाई केली जाणार आहे

jalgaon municipal corporation
CBI Inquiry : निंभोरा पोलिसांत दाखल गुन्ह्याचा सीबीआयकडून तपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com