Jalgaon News: बातमी नेहमी भूतकाळातच लिहा! राज्य पुस्तक मंडळाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला

marathi kumar bharti ssc book
marathi kumar bharti ssc bookesakal
Updated on

Jalgaon News : राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे निर्मित इयत्ता दहावीच्या मराठी प्रथम भाषेचे कुमारभारती या अधिकृत क्रमिक पाठ्यपुस्तकात ‘बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी’ असे चुकीचे बेजबाबदार विधान करण्यात आल्याचे शिक्षणतज्ज्ञ प्र. ह. दलाल यांनी एका पत्रकान्वये लक्षात आणून दिले आहे. (Always write news in past tense State Book Board strange advice to 10th students Jalgaon News)

श्री. दलाल यांच्या म्हणण्यानुसार, या पाठ्यपुस्तकात अनेक चुका आहेत. पान नंबर १०६ वर ‘बातमी लेखन’ या सदरात बातमी तयार करण्याचे काही निकष दिलेले आहेत. त्यात क्रमांक तीनमध्ये ‘बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी’ असे अत्यंत चुकीचे विधान केले आहे.

याशिवाय पान नंबर १०७ वरील बातमी लेखन नमुनाकृतीत खालील विषयावर बातमी तयार करा असे सांगून विषय दिला आहे. सर्व नागरिकांसाठी आधार कार्डचा नंबर आपल्या बँक खात्याला लिंक करणे अनिवार्य आहे.

मग आता ही बातमीवरील निकषानुसार भूतकाळात कशी लिहावी? असा प्रश्‍न श्री. दलाल यांनी उपस्थित केला आहे. पान नंबर १०६ वर बातमीचे क्षेत्र चौकटीत सांस्कृतिक क्रीडा या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात, अशी स्पष्ट सूचना केलेली आहे.

तर नमुना कृती बातमी तयार करा यातील विषयातच मोठी विसंगती आढळते. घडलेल्या घटनांच्याच नव्हे तर भविष्यात घडणाऱ्या व वर्तमानात घडत असलेल्या घटनांच्याही बातम्या तयार होऊ शकतात, ही साधी व नित्य परिचयातील बाब या मंडळातील तज्ज्ञ मंडळींना लक्षात कशी आली नाही?

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

marathi kumar bharti ssc book
Jal Jeevan Work : अजबच! जलजीवनच्या कामांमध्ये गावकऱ्यांचे असहकार्य; कानळद ग्रामपंचायतीतील प्रकार

की त्यांना आपल्या जबाबदारीचे भान नाही? आपली एखादी चूक राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना भोगावी लागेल ही जाणीव त्यांना का नाही? असे अनेक प्रश्‍न श्री. दलाल यांनी उपस्थित केले आहेत.

यंदा दहावीचा निकाल लवकर लागणार, पंतप्रधान पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार, दिल्लीच्या राम मैदानावर आंतरराष्ट्रीय कृषी यंत्र प्रदर्शन सुरू अशा वर्तमानातील व भविष्यकाळातील अनेक बातम्या विद्यार्थी प्रत्यक्षात वर्तमानपत्रात वाचतात पाहतात आणि टीव्हीवरही ऐकतात.

तेव्हा ‘बातमी नेहमी भूतकाळात असावी’ असा पाठ्यपुस्तकातील अजब सल्ला विद्यार्थ्यांच्या मनात वैचारिक गोंधळ निर्माण करणारा आहे.

याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण म्हणणार का? उठता बसता सतत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा जप करणाऱ्या शिक्षण विभागाच्या उक्ती आणि कृतीतील ही विसंगती चिंता निर्माण करणारी आहे, अशी खंतही प्र. ह. दलाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.

marathi kumar bharti ssc book
Polyandry Relationship: अजबच! दोन पतींसोबत मजेत जगतेय 'ही' महिला आता तिसऱ्याचीही होणार एन्ट्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.