
अमळनेर विधानसभा विधानसभा नक्की कोण जिंकणार हे पाहणं खूप उत्सुकतच होते. कारण यंदा निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र होते. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल भाईदास पाटील त्यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी अपक्ष निवडणूक लढवीत होते. यात अनिल पाटलांनी बाजी मारली.