Market Committee Election : स्मिता वाघ, शिरीष चौधरी निवडणूक एकत्र लढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former MLAs Smita Wagh and Shirish Chaudhary along with office bearers and activists gathered for the market committee election meeting.

Market Committee Election : स्मिता वाघ, शिरीष चौधरी निवडणूक एकत्र लढणार

अमळनेर (जि. जळगाव) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी आमदार स्मिता वाघ व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित मोट बांधण्याचा निर्णय घेतला असून, ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमीच्या मुहूर्तावर एकत्रित बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. (Amalner Market Committee Smita Wagh Shirish Chaudhary will contest election together jalgaon news)

या निर्णयामुळे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल रिंगणात उतरणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याचे नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या आशीर्वादाने या दोन्ही माजी आमदारांनी एकत्र येऊन अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढवण्याचा संकल्प केला आहे. एवढेच नव्हे तर निवडणूक सोबत लढण्याचा निर्णय झाल्याने बाजार समितीवर भाजपचा झेंडा पुन्हा फडकणार, असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

दरम्यान, बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही स्थानिक नेत्यांचे झालेले हे मनोमिलन इच्छुक उमेदवारांचे मनोधैर्य आणि ताकद वाढविणारे ठरणार असून, यानिमित्त भाजपचे तगडे आव्हान विरोधकांसमोर उभे राहणार, हे स्पष्ट झाले आहे.