

Six Killed in Amalner Triple Crash While Heading to Engagement
Esakal
अमळनेर, ता. ९ धुळ्याकडून अमळनेरकडे भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीपाठोपाठ एसटी बसला धडक दिली. या तिहेरी अपघातात सहा जण ठार झाले. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी सातच्या सुमारास अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळ गावापुढील हॉटेल वृंदावनजवळ घडली. अंबापिंप्री (ता. पारोळा) येथील मूळ रहिवासी, मात्र व्यवसायानिमित गुजरातमधील व्यारा येथे स्थायिक झालेले महाजन कुटुंबीय त्यांच्या भाच्याचा अमळनेर येथील राजेंद्र एकनाथ महाजन यांच्या मुलीशी साखरपुडा कार्यक्रमासाठी कार (जीजे १९, एएफ ३१४७) ने धुळ्याकडून अमळनेरला येत होते. Family Tragedy: 6 Die in Horrific Jalgaon Road Accident