अमृत ज्येष्ठ नागरिक योजना : 75 वर्षांवरील 2 हजारांवर नागरिकांचा मोफत प्रवास

MSRTC ST Bus
MSRTC ST Bus esakal

जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेला गेल्या शुक्रवारपासून (ता. २६) सुरुवात झाली. एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातून गेल्या दोन दिवसात ७५ वर्षे वयोगटावरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’ व्दारे २ हजार ५९ ज्येष्ठ नागरिकांनी एसटी बसमधून मोफत प्रवास केला.

मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. (Amrut Jyeshtha Nagarik Yojana Free travel to 2000 citizens above 75 years of age by MSRTC Jalgaon Latest Marathi News)

एसटी महामंडळाची ‘लालपरी’ कानाकोपऱ्यात पोचली आहे. एसटी प्रवास सुरक्षित असतो यामुळेच ज्येष्ठ नागरिक एसटीतून प्रवासाला पसंती देतात. एसटीतर्फे ६५ वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्धा तिकटाच्या रकमेत प्रवास होता.

आता ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजनेचा फायदा मिळायला सुरूवात झाली. यामुळे ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला आहे.

MSRTC ST Bus
2 वर्षांनंतर गजबजणार भालेकर मैदान; गणेशोत्सव मंडळांकडून तयारी अंतिम टप्प्यात

मोफत प्रवास केलेले प्रवासी असे

तालुका--प्रवासी

जळगाव- २५३

यावल-१८३

चाळीसगाव-३२१

अमळनेर-१७८

चोपडा-२६३

जामनेर-१८६

रावेर-७९

पाचोरा-१६९

भुसावळ-१००

एरंडोल-१४४

एकूण-- २०५९

"७५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास सवलतीची अंमलबजावणी केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासादरम्यान आधार, पॅन, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, केंद्र, राज्य शासनातर्फे देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत लागू आहे." - भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, जळगाव.

MSRTC ST Bus
Ganeshotsav 2022 : गणेशभक्तांसाठी यंदाही ‘SAKAL’तर्फे अनोखी स्पर्धा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com