Bhusawal Bazar Samiti : भुसावळ बाजार समिती सभापतिपदी अनिल वारके बिनविरोध

Activists felicitating the newly elected Speaker and Deputy Speaker.
Activists felicitating the newly elected Speaker and Deputy Speaker. esakal

Jalgaon News : माजी आमदार संतोष चौधरी व आमदार एकनाथ खडसे यांना धक्का देत आमदार संजय सावकारे यांनी बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर बुधवारी (ता. २४) बाजार समिती सभापतिपदासाठी निवडणूक झाली. (Anil Warke unopposed for post of Bhusawal Bazar samiti Chairman jalgaon news)

त्यात ठरल्याप्रमाणे सभापतिपदी भाजप प्रणित पॅनलचे अनिल चिंधू वारके तर उपसभापतिपदी शिवाजी पंडीत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. साधारण एक वर्षांसाठी ही निवड असणार असून, पाच वर्षात पाच सदस्यांना संधी देण्याचे भाजपचे नियोजन आहे तर उपसभापती पदासाठी एका वर्षात दोघांना संधी मिळू शकते.

चुरशीच्या लढतीत बाजार समिती भाजपकडे काही दिवसांपूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन भाजप प्रणित पॅनलने महाविकास आघाडी प्रणित पॅनलचा पराभव करीत १५ जागांवर विजय मिळविला होता तर तीन जागा अवघ्या महाविकास आघाडीला मिळाल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Activists felicitating the newly elected Speaker and Deputy Speaker.
Water Crisis : टंचाईची गावे अन्‌ टँकरही वाढले...! 18 गावात 20 टँकरने पाणीपुरवठा

निवडणुकीनंतर सभापती व उपसभापती पदाबाबत उत्सुकता लागली असताना बुधवारी निवड बिनविरोध झाली. बुधवारच्या बैठकीत सभापतिपदासाठी अनिल वारके तर उपसभापदीपदासाठी शिवाजी पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

निवड जाहीर होताच मोठी फटाक्यांची आतिषबाजी करत या निवडीचे स्वागत करण्यात आले.माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी नवनियुक्त सभापती आणि उपसभापती यांचे स्वागत केले.

Activists felicitating the newly elected Speaker and Deputy Speaker.
Jalgaon News : आयपीएस अधिकाऱ्याची प्रतिक्षा; डीवायएसपी गावित, वाघचौरे, जाधव, डेरे यांची बदली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com