Jalgaon news : नीम येथील ग्रामसेवक लाचेच्या जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajendra patil

Jalgaon news : नीम येथील ग्रामसेवक लाचेच्या जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कळमसरे (जि. जळगाव) : नीम (ता. अमळनेर) येथील ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील यास वीटभट्टी चालकाकडून २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाला पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून ग्रामसेवकास अटक करण्यात आली आहे. (Anti-corruption department arrests Gram sevak Taking a bribe jalgaon news)

तक्रारदार विटभट्टीचालकास ना हरकत दाखला देण्यासाठी १७ जानेवारीस ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांनी २७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती सोमवारी (ता. २३) नीम ग्रामपंचायत कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तक्रारदारांचा नीम ग्रामपंचायत हद्दीत सुमारे ३० वर्षांपासून वीटभट्टीचा व्यवसाय आहे.

तक्रारदारांनी नियमाप्रमाणे अमळनेर तहसील कार्यालयात ६ हजार रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा तक्रारदारांना नीम ग्रामपंचायत हद्दीत जर वीटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सांगितले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Death Mystery: होमी भाभांच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात होता?

नीम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात नीम ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक राजेंद्र पाटील याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष २७ हजार ५०० रुपयांची मागणी करून लाच मागणी केलेल्या रकमेपैकी २५ हजार रोख रक्कम पंचासमक्ष नीम ग्रामपंचायत कार्यालयात स्वत: स्वीकारताना पकडण्यात आले आहे. मारवड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

दरम्यान, यासाठी सापळा व तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग (जळगाव) शशिकांत पाटील, सहसापळा अधिकारी व पथक पोलिस अधीक्षक संजोग बच्छाव, पोलिस कर्मचारी ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे, कारवाई मदत पथक पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, बाळू मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

हेही वाचा: Jalgaon News : क्रेडाई महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी अनिश शहा