Jalgaon Crime News : गुजरातमधील ड्रग्स तस्कराला यावलजवळ सिनेस्टाईल पकडले

यावल - भुसावळ रस्त्यावर घोडे पीर बाबाच्या दरगाहजवळ रविवारी (ता. ४) सायंकाळी अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) गुजरातमधील ड्रग्स तस्कर तरुणाला पकडले आहे.
crime
crimeesakal

Jalgaon Crime News : यावल - भुसावळ रस्त्यावर घोडे पीर बाबाच्या दरगाहजवळ रविवारी (ता. ४) सायंकाळी अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) गुजरातमधील ड्रग्स तस्कर तरुणाला पकडले आहे. हा तरूण या दरगाहजवळ कारद्वारे आला होता. त्याच्यासोबत तीन साथीदार होते.

त्यांच्याकडून एका पिस्तूलसह काही साहित्य हस्तगत करण्यात आले. या कारवाईदरम्यान त्याचे साथीदार शेतशिवारात पळून गेले. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. (anti-narcotics squad arrested young drug smuggler from Gujarat on Yawal Bhusawal road jalgaon crime news)

यावल -भुसावळ रस्त्यावर घोडे पीर बाबा यांची दरगाह आहे. या दरगाहजवळ कारमधून (जीजे ०५ आरएम ८४८०) सुरत (गुजरात) येथील मोबीन शाह हा ड्रग्स तस्कर आला होता. आपल्या मित्रांसोबत तो दरगाह बाहेर बसला होता.

त्याच्या मागावर गुजरात राज्याचे अर्थात अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) हे होते. रविवारी सायंकाळी साडेपाचला हे पथक येथे दाखल झाले आणि त्यांना पाहून मोबीन शाह हा फरार होत होता. मात्र पोलिसांनी त्याच्यावर पिस्तूल रोखले आणि सिनेस्टाइल त्यास ताब्यात घेतले.

या कारवाई दरम्यान त्याच्याबरोबर असलेले तीन साथीदार मात्र, शेतशिवारात फरार झाले. मोबीन शहा याच्याकडून पोलिसांच्या पथकाने एक पिस्तूलसह इतर काही वस्तू हस्तगत केल्या.

crime
Navi Mumbai Crime: वाशीत भरदिवसा दोन घरफोड्या; लाखोंचे दागिने गेले चोरीला

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी यावल पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार भूषण चव्हाण, मुस्तफा तडवी हे दाखल झाले.

त्यांना या पथकाने सांगितले, की हा ड्रग्स तस्कर शाह हा फरार होता. त्याचा शोध घेताना तो इथे मिळून आला. त्याला आता गुजरात राज्यातील सुरत येथील दिंडोली पोलिस ठाण्यात नेण्यात येईल. या कारवाईत दिंडोली पोलिस ठाण्याचे कुलदीपसिंग हमुभाई दया, दिवेश हरिभाई चौधरीसह इतर अधिकारी, कर्मचारी होते. कारवाईनंतर संशयित मोबीन शहा याला घेऊन पथक गुजरातकडे रवाना झाले आहे.

कार घटनास्थळी पडून

संशयित ज्या कारमध्ये आला होता, ती कार घटनास्थळीच पडून आहे. तर इतर फरार झालेल्या तिघांचा शोध लागू शकला नाही. मात्र पोलिसांना केवळ हा एकच संशयित हवा होता म्हणून त्याला घेऊन ते रवाना झाले. या कारवाईची माहिती तालुक्यात पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.

crime
Mumbai Crime: मुलुंडमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये होत आहे वाढ !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com