
‘चोसाका’ला शेतकऱ्यांकडूनही हिरवा कंदील
चोपडा : शेतकऱ्यांचा ऊस थकीत रकमेसह चोसाका को-जनरेशन (chopda sugar factory) व भाडेतत्त्वावर (rental basis) देण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष अतुल ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा (Special General Meeting) झाली. यात चर्चा होऊन शेकडो शेतकऱ्यांसह (Farmers) सभासदांनी (Members)हात वर करून एकमुखाने ठरावास मंजुरी दिली.(approval from farmers for leasing chopda sugar factory)
या वेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, भाजप नेते घनश्याम अग्रवाल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, नीता पाटील, यशवंत निकम, बाजार समितीचे सभापती कांतिलाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष दुर्गादास पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्या इंदिरा पाटील, चोसाका उपाध्यक्ष शशिकांत देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील, शांताराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हाळके, बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील, चोसाका संचालक आनंदराव रायसिंग, चंद्रशेखर पाटील, प्रवीण गुजराथी, प्रा. भरत जाधव, भरत पाटील, गोपाळ धनगर, विजय पाटील, नीलेश पाटील, अनिल पाटील, जितेंद्र पाटील, सूतगिरणीचे उपाध्यक्ष पी. बी. पाटील, संचालक शशिकांत पाटील, प्रकाश रजाळे, सूतगिरणीचे उपाध्यक्ष पी. बी. पाटील, कार्यकारी संचालक अकबर पिंजारी आदी उपस्थित होते.
चोसाकाचे संस्थापक अध्यक्ष (स्व.) धोंडू आप्पा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून विशेष सर्वसाधारण सभेला सुरवात झाली. सभेत एकूण तीन विषयांवर चर्चा झाली. सचिव आधार पाटील यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. चोसाका अध्यक्ष ठाकरे यांनी सभेचे प्रास्ताविक केले. या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, की चोसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुण्याला आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. चोसाका भाडेतत्त्वावर देण्याचा २०१९ चा ठराव साखर आयुक्तांनी रद्द केला असून, विशेष सर्वसाधारण सभा घेऊन नवीन ठराव करावा म्हणून आजची ही सभा घेतली आहे. हा ठराव आयुक्तांकडे देऊन त्यांच्याकडून मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवून मग निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. चोसाकाच्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून तीन, चार वर्षे कमीची रिकव्हरी असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार एक कोटी रुपये वार्षिक भाडे मिळणार आहे. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार १५ वर्षांसाठी कारखाना भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. पण तो २५ वर्षांसाठी दिला जावा. यासाठी काही अडचणी आहेत. चोसाकावर आज १६२ कोटींचे कर्ज आहे. त्यात ६२ कोटी शासकीय देणी आहे, जो कोणी भाडेतत्त्वावर घेईल त्यांना पहिल्यांदा शासकीय कर्ज फेडावे लागणार आहे. बुलडाणा अर्बनचे ४७ कोटी रुपये चोसाकावर घेणे आहे. आमचे सर्व संचालक व सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करून २७ कोटी रुपयांत वनटाइम सेंटलमेंट केली गेली आहे. सभेत शेतकरी नारायण पाटील (चहार्डी), प्रदीप पाटील (घोडगाव), प्रमोद पाटील (गणपूर), तुकाराम पाटील (पंचक), विश्वनाथ पाटील (अकुलखेडा) आदींनी प्रश्न उपस्थित केले.
...अन् शेतकऱ्यांचे झाले समाधान
सभेदरम्यान घोडगाव येथील प्रदीप पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या थकीत पेमेंटबाबत प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी चोसाकाचे माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील यांनी शेतकऱ्यांचे चोसाकाकडे असलेले १३ कोटी १३ लाख ८९ हजार रुपये लवकर देणे शक्य नाही. चोसाका भाडेतत्त्वावर देण्याची निविदाप्रक्रिया झाल्यानंतर दोन कोटी ८५ लाख लागलीच टाकले जातील तसेच ६०० पैकी शेतकऱ्यांच्या खात्यावर निम्मे रक्कम ३०० खात्यावर टाकली जाईल, तर उर्वरित ३०० रुपये कारखान्याच्या शेअर भागभांडवलात जमा करण्यात येणार असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगून शेतकऱ्यांचे समाधान केले.