अर्चना पंजाबी राज्यातून पाचवी; औषधशास्त्र विषयात सुवर्णपदक

जळगाव ‘जीएमसी’ची विद्यार्थिनी : आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे माहिती जाहीर
Archana Punjabi fifth from state Gold Medal in Medicine
Archana Punjabi fifth from state Gold Medal in Medicinesakal
Updated on: 

जळगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांचा निकालानंतर सुवर्णपदक धारकांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील (जीएमसी) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अर्चना महेश पंजाबी हिने प्रावीण्य मिळवले आहे. ती राज्यातून पाचवी आली असून औषधशास्त्र विषयात राज्यातून प्रथम आली आहे.

Archana Punjabi fifth from state Gold Medal in Medicine
नागपूर : ग्रंथालय, शिक्षण विभागात ७४ लाखांची बोगस बिले

पहिल्या वर्षी देखील तिने महाविद्यालयातून उत्तम गुणांकन प्राप्त केले होते. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निकालातही तिने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नाव उंचावले आहे. राज्यभरातून ती पाचवी आली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय औषधशास्त्र विषयांमध्ये ती राज्यातून प्रथम आली असून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तिच्या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. किशोर इंगोले, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. इमरान तेली यांनी तिचे कौतुक केले.

''महाविद्यालयांमध्ये तासिकांमध्ये शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि सोप्या पद्धतीने केलेला अभ्यास यामुळे यश मिळवणे सोपे गेले. यशामध्ये शिक्षक वर्गासह पालकांचा मोठा वाटा आहे. यशामुळे प्रोत्साहन मिळाल्याने तृतीय वर्षालादेखील मोठ्या उत्साहाने अभ्यास करणे सोपे जाणार आहे.''

- अर्चना पंजाबी, द्वितीय वर्ष, एमबीबीएस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com